दिग्गजांसोबत भूमिका, २५०० चित्रपट नावावर; ५७ वर्षांच्या कारकीर्दीनंतरही अभिनेत्याला इंडस्ट्रीत मिळाली नाही ओळख

Khozmaster
3 Min Read

मुंबई – चित्रपट सृष्टीतअसे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत वर्षानुवर्षे काम केलं असून त्यांना अद्याप स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. आमिर लकडावाला गेल्या ५७ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या दुनियेत आहे. पण त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याला हवी तशी ओळख मिळाली नाही. ‘गाइड’ हा चित्रपट बनत असताना आमिरने मेहबूब स्टुडिओमध्येही काम केलं होतं. आपल्या करिअरमध्ये त्याने दिलीप कुमारपासून दीपिका पादुकोणपर्यंत सर्वांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. जितेंद्र यांच्यासोबत करिअरची सुरुवात करणाऱ्या आमिरने आत्तापर्यंत अडीच हजार चित्रपटांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.जितेंद्र यांच्या चित्रपटातून आमिर लकडावालाने त्याच्या करिअरला सुरुवात केली

करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आमिरने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून गेल्या वर्षी त्यांनी NBT ला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वतःच्या कामाबद्दल सांगितले होतं. त्याने सांगितलं की, १९६६ मध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्याने अभिनयक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. १९६७ मध्ये व्ही शांताराम यांच्या ‘बूंद जो बन गए मोती’ या चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये त्याने एका तरुण मुलाची भूमिका साकारली होती.५६ वर्षे काम करूनही अभिनेत्याला ओळख मिळाली नाही

जितेंद्रच्या चित्रपटातून आमिरने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने दिग्गज कलाकार दिलीप कुमार यांच्यासोबतही काम केलं. दिलीप कुमार यांच्या ‘कर्मा’ चित्रपटातील ‘दिल दिया है जान भी देंगे…’ या गाण्यातही तो दिसला होता. सलमान खानसोबत ‘जुडवा’ सिनेमात तर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली असून ती लोकप्रियसुद्धा झाली होती.दरम्यान, आमिरने ‘झनक झनक पायल बाजे’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, दिलीप कुमार यांच्या ‘बैराग’, ‘कर्मा’, राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ सारख्या चित्रपटात त्याने छोट्या भूमिका केल्या आहेत. जवळपास ६ दशकांच्या कारकिर्दीत त्याने इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केलं आहे.

जितेंद्र यांच्या चित्रपटातून आमिर लकडावालाने त्याच्या करिअरला सुरुवात केली

करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आमिरने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून गेल्या वर्षी त्यांनी NBT ला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वतःच्या कामाबद्दल सांगितले होतं. त्याने सांगितलं की, १९६६ मध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्याने अभिनयक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. १९६७ मध्ये व्ही शांताराम यांच्या ‘बूंद जो बन गए मोती’ या चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये त्याने एका तरुण मुलाची भूमिका साकारली होती.

५६ वर्षे काम करूनही अभिनेत्याला ओळख मिळाली नाही

जितेंद्रच्या चित्रपटातून आमिरने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने दिग्गज कलाकार दिलीप कुमार यांच्यासोबतही काम केलं. दिलीप कुमार यांच्या ‘कर्मा’ चित्रपटातील ‘दिल दिया है जान भी देंगे…’ या गाण्यातही तो दिसला होता. सलमान खानसोबत ‘जुडवा’ सिनेमात तर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली असून ती लोकप्रियसुद्धा झाली होती.दरम्यान, आमिरने ‘झनक झनक पायल बाजे’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, दिलीप कुमार यांच्या ‘बैराग’, ‘कर्मा’, राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ सारख्या चित्रपटात त्याने छोट्या भूमिका केल्या आहेत. जवळपास ६ दशकांच्या कारकिर्दीत त्याने इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *