छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील बी.एच.एम.एस डॉक्टर महिलेने आपल्या सहा महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना काल मंगळवारी सायंकाळी सात वाजता सुमारास घडली. दरम्यान पोलिसांच्या हातात प्रयत्नानंतर नऊ वाजेच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळला. मात्र बाळाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही म्हणून शोधकार्य सुरू आहेत. डॉक्टर महिलेने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकले नाही.डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे (रा. चांगतपुरी, ता. पैठण) असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाकडे जायचंय या कारणामुळे डॉक्टर पूजा यांनी नेहमी ने-आण करणाऱ्या रिक्षा चालकाला घरी बोलावले. सहा महिन्याच्या चिमुकलीला घेऊन त्या रिक्षात बसल्या. पैठण शेगाव रस्त्यावरील पाटेगाव येथील पुलावर त्यांनी रिक्षा चालकाला नदी बघायची म्हणून थांबायला सांगितले. सहा महिन्याच्या बाळासह नदी बघत असताना त्यांनी कठड्यावरून नदीत उडी घेतली. दरम्यान त्यांनी उडी घेतल्यानंतर घटनेची माहिती रिक्षाचालकाने तातडीने स्थानिकांनी पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल झाला. रात्रीपर्यंत महिलेचा शोध सुरू होता मात्र अंधार असल्यामुळे शोधकार्य करण्यास अडथळा येत होता. अखेर रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळला. मात्र अद्याप सहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह आढळलेला नाहीय.दरम्यान, घटना घडली तेव्हा रिक्षाचालक एकटाच होता. त्याला ही माहिती मिळताच तातडीने ही माहिती फोनवरून कळवली. यावेळी अग्निशामक दल मच्छीमार यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आलं. सहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून त्याचा शोध सुरू आहे. डॉक्टर पूजा यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीय. असं पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सांगितले.
पुण्यात पुन्हा हेलिकॉप्टर कोसळलं
दरम्यान, पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमने यासंदर्भात माहिती दिली आहे. गेल्या महिन्यातच हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा अपघात झाला आहे.