मुकेश अंबानी गेम पलटवणार, Mutual Fund क्षेत्रात त्सुनामी येण्याची शक्यता; SEBI कडून आली मोठी बातमी

Khozmaster
2 Min Read

मुंबई : भांडवली बाजार नियम सिक्युरिटीज ऑफ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने म्युच्युअल फंडशी निगडित मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने जिओ फायनान्शिअल आणि ब्लॅकरॉक यांना म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. आशियातील गडगंज श्रीमंत मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या एंट्रीमुळे म्युच्युअल फंड उद्योगात स्पर्धा आणखी वाढेल. म्युच्युअल फंडांमध्ये सध्या ६६ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

अंबानी गाजवणार म्युच्युअल फंडचा बाजार
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने शुक्रवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंटसह संयुक्त उपक्रमाला ३ ऑक्टोबर रोजी म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करण्यासाठी सेबीची तत्वतः मान्यता मिळाली आहे तर, सर्व आवश्यक कागदपत्रे प्रदान केल्यानंतर सेबी जिओ आणि ब्लॅकरॉकला अंतिम मंजुरी देईल असेही कंपनीने म्हटले. दोन्ही कंपन्या जुलै २०२३ मध्ये एकत्र आले होते तर, ऑक्टोबर २०२३ मध्ये सेबीकडे परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही कंपन्यांनी मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायात सुमारे ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली असून दोन्ही कंपन्या संयुक्त उपक्रमात १५-१५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करतील.

स्वस्त आणि शाश्वत गुंतवणूक पर्याय देण्याचा प्रयत्न
ब्लॅकरॉकचे इंटरनॅशनल हेड रेचेल लॉर्ड यांनी मान्यता मिळाल्यावर आनंद व्यक्त केला. भारतातील करोडो लोकांना स्वस्त आणि शाश्वत गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले. तसेच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेससह आम्ही भारताला बचत करणाऱ्या देशातून गुंतवणूक करणाऱ्या देशात बदलण्याचा प्रयत्न करण्याचेही त्यांनी म्हटले.सध्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ग्राहकांना विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून देते. यापूर्वी जिओ फायनान्शिअल अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी होती जी ऑगस्ट २०२३ मध्ये स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची उपकंपनी जिओ फायनान्सला आरबीआयने NBFC परवाना दिला असून जिओ पेमेंट्स बँक कंपनीची दुसरी उपकंपनी आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसला RBI कडून NBFC मधून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी (CIC) मध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *