सकल मराठा समाजाचा निर्धार दसरा मेळाव्याच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी बैठक संपन्न
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
नारायण गड येथे ÷ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यात मंठा तालुक्यातून एक लाख मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. मंठा येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि. ४) या सभेच्या पूर्वतयारीसाठी सकल मराठा समाजाची बैठक झाली. यावेळी हा निर्धार करण्यात आला. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यापक स्वरुपात महाराष्ट्रभर लढा सुरु केला आहे. गेली बारा महिने झाले हा लढा सुरु आहे
प्रमाणपत्र देऊन आरक्षण देऊ,
काही दिले नाही.
बिड जिल्हा मध्ये नारायण गड येथे सकल मराठा समाज बांधवांचा दसरा मेळावा निमित्त विराट सभा आयोजित करण्यात आली आहे. सकल मराठा समाज मंठा तालुक्याच्या वतीने शुक्रवारी मंठा येथील शासकीय विश्रामगृहात
दसरा मेळाव्या पूर्वतयारीसाठी बैठक पार पडली. या बैठकीत सभेचे नियोज करण्यात आले गाड्या लावायसाठी बॅनर मोठमोठे बॅनर व गावागावात जाऊन मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने चार टीम तयार करण्यात आल्या व नारायणगड येथे दसरा मेळावा निमित्त सकल मराठा समाज बांधव जास्तीत जास्त येतील याची नियोजन करण्यात आले.
नारायण गडाच्या मैदानावर १२ ऑक्टोंबर सकाळी आकार वाज ही सकल मराठा समाज बांधवांचा दसरा होणार असू या मेळाव्याला मंठा शहरा सह तालुक्याती गावागावातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, एक लाख मराठा बांधव मेळाव्याला उपस्थित राहतील, आसे नियोजन केले सकल मराठा समाज मंठा तालुक्यातील बांधवांच्या वतीने बैठक आयोजिन करण्यात आले. यावेळी मंठा तालुक्यातील शेकडो मराठा बांध उपस्थित होते.
मंठा येथील शासकीय विश्रामगृहात नारायण गड दसरा मेळावा पूर्वतयारी व नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीस जमलेले सकल मराठा समाज बांधव,