मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
मातोश्री एज्युकेशन सोसायटी मेहकर,द्वारा संचलित सत्यजीत इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल खंडाळा मेहकरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करीत उत्तुंग गगन भरारी घेत विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
यामध्ये वयोगट १७ मध्ये सोहम सुरेश चव्हाण याची बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात विभागीय स्तरावर निवड झाली.
बॅडमिंटनमध्ये वयोगट १७ वर्षामध्ये पलक अग्रवाल,अक्षरा काबरा
प्राची बळी,राजश्री गिऱ्हे व आरती पवार प्रथम क्रमांक,वयोगट १९ वर्षामध्ये निष्ठा माळी,अपूर्वा चांगाडे चैताली होणे, स्नेहा कुलकर्णी व श्रद्धा बोरकर प्रथम क्रमांक. वयोगट १९ वर्षामध्ये शशांक गायकवाड,आयुष शिंदे, तेजस वाटसर,ऋतुराज वायाळ,प्रज्वल तनपुरे या मुलांनी प्रथम क्रमांक, वयोगट १४वर्षामध्ये सोहम गीते व सोहम चव्हाण आणि मुलींमधून वयोगट १७ वर्षामध्ये राजश्री गिऱ्हे यांनी प्रथम क्रमांक.
वयोगट १४ वर्षामध्ये रनिंग स्पर्धेमध्ये अमृता दांदडे १०० मीटर रनिंग प्रथम, लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक,कुमारी पल्लवी राठोड उंच उडी मध्ये तृतीय क्रमांक,पल्लवी दिघोळे हिने हातोडा फेक मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.रिले रनिंग स्पर्धेमध्ये अमृता दांदडे, पल्लवी राठोड,निसर्गा काळे,ईश्वरी बोरबळे, इच्छा राठोड यांनी द्वितीय क्रमांक.वयोगट १७ वर्षामध्ये रिले रनिंग स्पर्धेमध्ये श्रेया आलेगावकर, आस्था गाताडे, सृष्टी नवले, आर्या सातपुते या मुलींनी तृतीय क्रमांक,वयोगट १४ वर्षामध्ये सोहम वारकरी याने उंच उडी मध्ये द्वितीय क्रमांक,उदय डिघोळे याने २०० मीटर रनिंगमध्ये तृतीय क्रमांक,प्रसाद गायकवाड या विद्यार्थ्याने हातोडा फेक मध्ये द्वितीय क्रमांक,उदय डिघोळे या विद्यार्थ्याने क्रॉस कंट्री या स्पर्धे मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला या सर्वांची जिल्हास्तरावर निवड झाली.
तसेच जिल्हास्तरीय स्केटिंग क्रीडा प्रकारांमध्ये श्याम होणे, वरुण अग्रवाल सुरभी मासोडकर दिव्या मोहरुत या मुला मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली.
संस्थेचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर संस्था सचिव भूषण मिनासे सर प्राचार्य रवींद्र माळी सर आदिंनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.