गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
.सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभाग मार्फत शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 65 वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांना पायाभूत साधने किंवा उपकरणे खरेदीसाठी ३००० रुपये अर्थसहाय्य अनुदान देण्याचे ठरविले होते.हे अनुदान लवकरात लवकर वितरणासाठी पंचायत समिती मंठा गटविकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना द्वारे शासनाला हे निवेदन मा.सरपंच अविनाश राठोड आणि सहकार्याच्या अनुषंगाने देण्यात आले.ज्या नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अर्ज संबंधित विभागाला सादर केलेली आहे किंवा जमा केले आहे.,त्यापैकी प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात हे अर्थसाह्य जमा करण्यात यावे अशी विनंती या निवेदन द्वारे करण्यात आलेली आहे.मंठा पंचायत समिती वरिष्ठ सहाय्यक आर.जी नवले आणि एस.एन भाताने यांनी हे निवेदन स्वीकारले आहे.
निवेदनामध्ये त्याच प्रमाणे महिला सशस्त्रिकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना तिसऱ्यांदा योजनेच्या अनुषंगाने अनुदान प्राप्त झालेले आहे.त्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वर्षातून एकदा ३००० रु हे अनुदान देण्याचे ठरवले होते.
हे अर्थसाह्य अनुदान लवकरात लवकर पात्र जेष्ठ नागरिकांच्या आधार बेस खात्यावर टाकण्यात यावे अशी विनंती या द्वारा केलेली आहे.
या निवेदनावर श्रीहरी मगर ,गजानन फुपाटे, नितीन चाटे ,बाबासाहेब घाडगे ,विनायक राठोड ,नारायण राठोड, किशोर राठोड, राहुल राठोड ,गोविंद सानप, भगवान घुगे ,महेश देशमुख इतरांच्या सह्या आहेत.
Users Today : 22