शालेय बुध्दीबळ स्पर्धेसाठी अमरावती विभाग स्तरावर परी चव्हाणची निवड
मेहकर :-(कार्यालय प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ४ ऑक्टोंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल,बुलढाणा येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली होती.यामध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात खेळताना कु.परी चव्हाण हीने सहापैकी पाच सामने जिंकले.आपल्या उत्कृष्ट व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत परी चव्हाणने आपले निर्विवाद वर्चस्व स्पर्धेत सिध्द करुन द्वितीय क्रमांक पटकावला. यामुळे ऑक्टोंबरच्या शेवटी होणाऱ्या अमरावती विभागस्तर बुद्धिबळ स्पर्धेसाठी परी चव्हाणची निवड झाली आहे.सोबतच परी चव्हाण हिला बुध्दीबळ खेळात आंतरराष्ट्रीय रेटिंग सुद्धा प्राप्त झाले आहे.परी चव्हाण ही मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे इयत्ता सातव्या वर्गात जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा खंडाळा या ठिकाणी शिकत आहे.आपल्या यशाचे श्रेय परी प्रसिद्ध बुद्धिबळ मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त बुद्धिबळ खेळाडू सुरेश चव्हाण,आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त बुध्दीबळ खेळाडू चेतन चव्हाण, आई सौ.प्रिया चव्हाण, मुख्याध्यापक गायकी सर,शिक्षक ढवळे सर,थेटे सर व तसेच प-हाड कोचिंग क्लासेसचे अध्यक्ष विनोद प-हाड सर व सौ.स्वाती प-हाड मॅडम यांना देते