मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
गौरी गणपती,दुर्गा उत्सव आणि दिपावली चा सन गोरगरिबांना आनंदात साजरा करता यावा म्हणून शासनाने अंत्योदय,अन्न योजना,प्राध्यान्य कुटुंब,शिधापत्रिका धारकांना रवा,चना डाळ,साखर (प्रत्येकी एक किलो) खाद्यतेल (एक लीटर) शंभर रुपये मध्ये दिनांक १९ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान वितरीत करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप गोरगरिब पात्र शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकाना मार्फत लाभ मिळालेला नाही.या बाबत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे मेहकर तालुकाध्यक्ष विजय माने यांनी नायब तहसीलदार अजय पिंपरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून त्यामध्ये वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन आनंदाचा शिधा उपलब्ध करा व तात्काळ आनंदाचा शिधा वाटप करा अशी मागणी करण्यात आली आहे.
Users Today : 17