मेहकर येथे सौ राजश्री जाधव यांच्या हस्ते कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाचे उदघाटन संपन्न

Khozmaster
2 Min Read
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) 
मेहकर शहरामध्ये सन २०१६ पासुन  नवरात्रीच्या दरम्यान महिलांना आपला आनंद साजरा करता यावा याकरिता सर्वप्रथम गरबा व दांडिया महोत्सव सुरू करण्याची परंपरा चव्हाण चेस ॲकॅडमीने सुरु केली होती.या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी महेश रिंढे संचालक कृषी वैभव लाॅन यांचे मोठे पाठबळ चव्हाण चेस अकॅडमी ला मिळाले.चव्हाण अकॅडमीने कृषी वैभव लाॅनच्या सहकार्याने सुरु केलेले गरबा व दांडिया महोत्सव नवव्या वर्षात पदार्पण करीत असून  कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ.राजश्री जाधव, कृषी वैभव लाॅनच्या संचालिका रिंढे काकू,युवा महिला नेतृत्व मयुरी जाधव पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या धर्मपत्नी सौ.कविता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सायंकाळी सात वाजता आरती करुन रितसर गरबा व दांडिया महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.सर्व मान्यवराचे कृषी वैभव लॉन व चव्हाण चेस अकॅडमीच्या वतीने सौ.प्रिया चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी महिलांशी संवाद साधताना सौ. मयुरी जाधव यांनी उपस्थित महिला भगिनींना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या तसेच महिलांनी आपला आत्मविश्वास वाढविल्यास महिला सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ शकतात असे सांगून उपस्थित महिलांचे मनोबल उंचावले.उपस्थित सर्व मान्यवरांचे चव्हाण चेस अकॅडमीच्या संचालिका सौ.प्रिया चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.उपस्थित सर्व मान्यवरांनी गरबा खेळून कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन केले.या गरबा व दांडिया महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व  विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येते.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष चव्हाण सहाय्यक अभियंता वाशिम,देवराव पवार वनविभाग अधिकारी मेहकर,चेतन चव्हाण राष्ट्रीय बुद्धिबळ मार्गदर्शक,पुणे आदिंनी अथक परिश्रम घेतल्याचे कार्यक्रमाचे आयोजक महेश रिंढे, सुरेश चव्हाण व सौ.प्रिया चव्हाण यांनी कळविले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *