नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा शहरवासीयांचा इशारा
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून नगरपंचायत च्या आशीर्वादाने खुल्या जागा व भूखंड काही महाभागाकडून होत आहे. आता तर , जिल्हा परिषद शाळेच्या खुल्या जागेवर दोन जणांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहेत.याप्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंठा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर दोन जणांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून नगरपंचायत च्या काही अधिकारी व मुख्याध्यापक यांच्याशी हात मिळवणी करून या जागेवर आपला ताबा गाडला आहे.याप्रकरणी काही नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.परंतु , यांनी त्यांच्या मुस्काट दाबी करत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील खुल्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली होती याचबरोबर विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता असलेल्या जागेचा उपयोग दोन जणांनी या जागेवरील वृक्षतोड करून खुल्या जागेवर बांधकाम करून दुकान चालू केली आहे. विशेष म्हणजे सदर जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी संबंधित यंत्रणेने विशेष दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदरील जागेची पाहणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सिओ यांनी करावी व या संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अनाधिकृत केलेले बांधकाम तात्काळ हटविण्यात यावे. नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व जनआंदोलन छेडण्यात येईल , असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर माजी ग्रामपंचायत सदस्य विजय बोराडे व प्रदीप वाघमारे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मंठा नगरपंचायत मधील मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी तसेच काही नगरसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मंठा शहरातील अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे तयार करून विविध ठिकाणी जागा हडप करत आहेत. या प्रकरणाची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकाकडून होत आहे.