किशोर गारोळे व ऋषांक चव्हाण दांपत्याची कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाला भेट

Khozmaster
2 Min Read
मेहकर :-(कार्यालय प्रतिनिधी)
मेहकर शहरामध्ये २०१६ पासुन नवरात्रीच्या दरम्यान महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या सर्वात लोकप्रिय गरबा व दांडिया महोत्सवाला उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहरप्रमुख युवा उद्योजक किशोर गारोळे  यांनी धर्मपत्नी रुपाली गारोळे,तसेच डोणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांनी धर्मपत्नी डॉ सौ ऋतुजा चव्हाण यांनी ६ ऑक्टोंबर २०२४ ला कृषी वैभव लॉन मेहकर येथे सुरु असलेल्या कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाला भेट देऊन गरबा व दांडिया महोत्सवात सहभागी व उपस्थित असलेल्या महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन मेहकर शहरात महिलांना या उत्सवाच्या माध्यमातून आपले आवड जपण्याची संधी मिळत असल्याचे सांगून आपण भविष्यात मेहकर शहर व तालुक्यातील महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला प्रसिद्ध युवा उद्योजक, उबाठाचे शहरप्रमुख किशोर गारोळे व त्यांच्या धर्मपत्नी सौ.रुपाली गारोळे यांच्या हस्ते ६ ऑक्टोंबर च्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना किशोर गारोळे व सौ.रुपाली गारोळे दांपत्याने महिलांना शुभेच्छा देऊन असे सांस्कृतिक कार्यक्रम मेहकर शहरात नियमित व्हावे यासाठी आपण सतत सहकार्य करु अशी भावना व्यक्त केली.सोबतच या कार्यक्रमाला डोणगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण व त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर सौ. ऋतुजा चव्हाण यांनीही सुद्धा भेट देऊन गरबा खेळून आपला आनंद साजरा केला तसेच महिलांना भरभरुन शुभेच्छा दिल्या.गरबा व दांडिया महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना ट्रॉफी,प्रमाणपत्र व  विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.गरबा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष चव्हाण सहाय्यक अभियंता वाशिम,देवराव पवार वनविभाग अधिकारी मेहकर,चेतन चव्हाण राष्ट्रीय बुद्धिबळ मार्गदर्शक पुणे हे अथक परिश्रम करीत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक महेशभाऊ रिंढे, यांच्यासह सुरेश चव्हाण व सौ.प्रिया चव्हाण यांनी कळविले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *