देऊळगाव मही नजीक राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण न काढल्यास तीव्र आंदोलन छेडणार:-राजेंद्र शिंगणे
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
चिखली जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ए वरील देऊळगाव मही नजीक लोकांना राष्ट्रीय महामार्गाने पादचारी मार्गाने पैदल चालण्यासाठी रस्ता होता परंतु अज्ञातांनी त्या रस्त्यावर बांधकाम व टीन पत्रे टाकून अतिक्रम केले असून सदर अतिक्रमण काढण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे सिंदखेडराजा विधानसभा सहप्रमुख
राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला यांना निवेदन दिले असून अतिक्रमण न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
१३ ऑगस्ट ला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने अतिक्रम काढण्यासाठी कैलास राऊत हे तीन दिवस अन्नत्याग आमरण उपोषणास बसले होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी १६ ऑगस्टला कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला यांना लेखी पत्र देऊन अतिक्रम काढावे असा आदेश दिला परंतु एक महिन्याच्या वर कालावधी उलटून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांनी केराची टोपली दाखवल्याचे तक्रार निवेदनात राजेंद्र शिंगणेंनी म्हटले आहे देऊळगाव मही हे गाव बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व बाजारपेठ असून देऊळगाव मही गावाला परिसरातील ५० खेड्यापाड्यांचे लोक बाजारासाठी येत असतात तसेच शाळेतील सर्व मुले व दवाखान्यासाठी जाणारे सर्व नागरिक वयोवृद्ध माता पिता,तरुण मंडळी विशेषतः जिल्हा परिषद मधील पहिली ते चौथी या वर्गातील लहान मुले हायवे रोडच्या मध्य भागामधून प्रवास करतात त्यांच्या व सर्व पादचारी लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे देऊळगाव मही मध्ये गावातून पैदल चालण्यासाठी पादचारी मार्ग अतिक्रम काढून मोकळा करावा जेणेकरून लहान मुलांच्या व वयोवृद्ध माता-पिता यांचा हायवे रोडवर अपघात होवून जीव जावू नये तसेच मोठा अपघात होऊन मोठी जिवीतहानी होऊ शकते अशी घटना घडू नये म्हणून पादचारी मार्ग मोकळा करावा न केल्यास आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण केल्या जाईल व पुढील होणाऱ्या परिणामाची जबाबदारी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला यांची राहील असा गंभीर इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सिंदखेडराजा विधानसभा सहप्रमुख राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.