मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
लोणार विधानसभा मतदार संघातील स्थानिक व निष्ठावंत शिवसैनिकास विधानसभेचे तिकीट देण्याचे मातोश्रीवर झालेल्या बैठकीत संकेत मिळाल्याची माहिती उबाठाचे डॉ गोपाल बच्छीरे यांनी दिली असून याबाबत अधिक माहिती अशी की ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई मातोश्री येथे मेहकर विधानसभा निवडणुकी संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना पक्ष सचिव आमदार मिलिंद नार्वेकर व शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेहकर लोणार विधानसभा मतदार संघाविषयी सविस्तर चर्चा होऊन या चर्चेत बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे,उपजिल्हाप्रमुख प्रा आशिष रहाटे, लोणार तालुकाप्रमुख ॲड. दीपक मापारी, शहरप्रमुख गजानन जाधव, मेहकर तालुकाप्रमुख लिंबाजी पांडव, शहरप्रमुख किशोर गारोळे, हे प्रामुख्याने सहभागी होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी मेहकर विधानसभेची परिस्थिती रेखाटली त्यात या मतदारसंघात निष्ठावंत ज्याने गद्दारीनंतर पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करून शेतकरी, कष्टकरी, महिला, दिव्यांग, बेरोजगार तरुण यांच्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे करून शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवली लोणारचे पवित्र धारतीर्थ तीर्थ स्नानासाठी खुले करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली व जनसामान्याच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले, त्यात डॉ. गोपाल बछिरे, किसन पाटील, प्रकाश डोंगरे अशा शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकाचा विचार व्हावा ही आग्रही भूमिका मांडली, त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सुद्धा या महितीस दुजोरा दिला.
लोणार शहरप्रमुख गजानन जाधव यांनी निवडणूक लढविण्याच्या अपेक्षेने डझनभर लोकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असल्याचे सांगत निष्ठावंतांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला असून त्यांनी केलेल्या पक्ष संघटन बांधणीचे, लोकोपयोगी आंदोलनाचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा लोकप्रियता निर्माण केली याचाही विचार व्हावा जेणेकरून जनसामान्यात एक चांगला संदेश जाईल असे वक्तव्य केले व त्यास उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला.
उपजिल्हाप्रमुख आशिष राहटे यांनी सिद्धार्थ खरात यांचे नाव पुढे केले मात्र
गत आठवड्यात पाच इच्छुक उमेदवार त्यात, डॉ. गोपाल बछिरे, किसन पाटील, प्रकाश डोंगरे, डॉ. जानू मानकर व ॲड सुमित सरदार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन एकमताने आमच्या पैकी कुणालाही उमेदवारी दिल्यास आम्ही त्या उमेदवाराचे काम करु व शिवसेनेचा उमेदवार निवडून आणू असा विश्वास दिला त्यावर उद्धव ठाकरेंनी तुमच्यापैकी एक नाव सुचवा असे सांगितले तेव्हा पाचही जणांनी डॉ. गोपाल बछिरे व सुमित सरदार यांचे नाव सुचविले त्याच बरोबर उर्वरित तिघांपैकी कुणालाही आपण उमेदवारी दिली तर आम्ही सर्व इच्छुक उमेदवार त्याचे तन,मन,धनाने काम करु असे लेखी पत्रच उद्धव ठाकरेंना दिले. त्याही पत्राचा उल्लेखही या बैठकीत झाला.
गत महिन्यात बरेच इच्छुक उमेदवार मातोश्रीवर प्रवेश घेण्यासाठी गेले होते त्यांना उध्दव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही सर्व जर विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाच्या अमिषा पोटी प्रवेश घेत असाल तर तिकीट एकच आहे ते एकालाच मिळणार असून ज्याला तिकीट दिले तुम्हा सर्वांना त्याचे काम करावे लागणार जर हे मान्य असेल तरच शिवसेनेत प्रवेश घ्या हे ऐकल्यानंतर माजी जिल्हा परिषद सभापती सौ. पुनम राठोड, प्रा. सतीश ताजणे यांनी प्रवेश न घेता काढता पाय घेतला होता तर मेहकरचे माजी नगराध्यक्ष, अशोक अडेलकर,सिद्धार्थ खरात, खामगावच्या उर्मिला ठाकरे यांनी प्रवेश घेतला होता
संपूर्ण मेहकर मतदार संघाची माहिती घेऊन उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांना डावलले जाणार नसल्याचे सांगून बैठकीचा समारोप केला.