मेहकर च्या राजकारणात नवा ट्विस्ट, विधानसभेच्या रिंगणात संघाची उडी, संघ स्वयंसेवक उतरणार मैदानात

Khozmaster
4 Min Read
विधानसभा निवडणुकीच्या रनधुमाळीची चर्चा सध्या सर्वत्र आहे असे दिसून येते.यातच मेहकर मतदार संघ मागे कसा राहील.
लोकसभा निवडणुकी नंतर एकूणच महाविकास आघाडीचा पवित्रा आता महाराष्ट्राच्या राजकारणावर आपण कब्जा केला आहे असा भासवतो दुसरीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांना अनेक योजनांच्या बळावर पुन्हा एकदा महायुती चे सरकार येऊ शकेल असा विश्वास वाटत असतो.
सरकार येणार कुणाचे याचे उत्तर सगळ्यात चांगल्या पद्धतीने तर येणारी वेळ च देऊ शकेल परंतु समग्र महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापलेले असतांना स्वाभाविक रित्या मेहकर विधान सभा यामधे देखील मोठी चढाओढ होतांना दिसून येते आहे. मागील अनेक पर्वात याठिकाणी शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. अभेद्य असा प्रतापगड मानला जातो परंतु शाश्वत विकासापासून वंचित असलेला हा मतदार संघ आज ही तितक्याच समस्या त्याच रोजच्या समस्यांना तोंड देतांना दिसतो.
ह्या मतदार संघाचा राजकीय शिरपेचात आता अनेक बदल होतील असे जाणवते आहे ह्या वेळी ही विधान सभा निवडणूक मेहकर मतदार संघात उमेद विरुद्ध प्रस्थापित अशी होण्याची दाट शक्यता वाटते. विद्यमान आमदार यांच्या विकासकामावर नाराज असलेली जनता आता काय पवित्रा घेते यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रभर जय्यत तयारी सुरू आहे असे चित्र असतांना ह्या मतदार संघात विद्यार्थी  संघटनेच्या मुशीत घडलेल नाव सद्ध्या चर्चेत आले आहे. आणि अश्या युवकांची नावे पुढे येणे ही काळाची गरज वाटते.
मेहकर च्या विकासाचे शाश्वत धोरण ज्याचा डोक्यात फिट असेल त्यालाच ह्यावेळी मेहकर मतदार संघातील जनता येथील चाव्या सोपवतील असे दिसून येते.
अर्थात आकाश अर्जुना अंभोरे हे नाव ह्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या वलयात प्रचंड चर्चेत आहे. आकाश अंभोरे हे विद्यार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा माध्यमातून महाराष्ट्रभर  विविध उपक्रम कार्यक्रम साठी कार्यरत असतात, विकासाचा दृष्टिकोन समाजाचे मन बघून आणि हित बघून ठरवणे हे आपले कर्तव्य आहे याची जाण असलेल हे नाव असेल याबाबत शंका वाटत नाही. स्वतः ग्रामीण भागात जन्मलेले आणि शेतात स्वतः काम केलेले असल्यामुळे या मतदार संघाशी जन्मता च नाळ जुडलेल व्यक्तिमत्व. अभाविप च्या माध्यमातून नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर सारख्या दुर्गम भागात विद्यार्थी हितासाठी अनेक आंदोलने अनेक मोर्चे करून विद्यार्थ्यांचा न्याय हक्कासाठी झटणारे हे व्यक्तित्व आहे तब्बल तीन हजार आदिवासी विद्यार्थिनींना धर्मांतरण होण्यापासून रोखण्याचे मोठे काम यांच्या माध्यमातून झाले आहे तसेच नंदुरबार च्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यलयाचा आवारात हजारो विद्यार्थ्यांना घेऊन धडक मोर्चा करण्यात आला त्याचे नेतृत्व आकाश अंभोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले नुकतीच संपूर्ण महाराष्ट्र भर संविधानाच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर यात्रा  महाराष्ट्रभर करण्यात आली त्या यात्रेचे मुख्य संयोजक म्हणून प्रमुख भूमिकेत आंभोरेच होते.
एकूणच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,वनवासी कल्याण आश्रम, सामाजिक समरसता मंच अश्या विविध संघ विचाराच्या सघटनांच्या मुशीत वाढलेले उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्य असलेलं,वैचारिक स्पष्टता आणी मेहकर ची जाण असलेले व मेहकर विधानसभेतील दुर्लक्षित असलेल्या लोणार तालुक्यातील जन्मलेले हे नाव मेहकर विधान सभेचा शाश्वत विकासाचे गमक ठरू शकेल असे वाटते. अर्थात नवी उमेद घेऊन कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना प्रस्थापितांच्या विरुद्ध दण्ड थोपटून बंड करायला तरुणाई ज्या वेळी तयार होऊ लागते त्यावेळी त्याचे परिमाण अगदीच आश्चर्यकारक असतात हे संपूर्ण जगानेच अनुभविले आहे. म्हणून आणी एकूणच विधानसभेची स्तिथी चा विचार करता विद्यमान आमदार यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आले आहे, आणि मेहकर मधील शिवसेना व भाजपा चे संबंध किंव्हा संघ आणि विद्यमान आमदार, खासदार यांचे संबंध सर्सश्रुत आहेत, अश्यावेळी संघ नवीन नेतृत्वाच्या दृष्टीने तर विचार करत नाही ना?  मेहकर विधानसभेतील विकासाची रिघ भरून काढण्यासाठी त्या विधानसभेतील प्रश्न समस्या आणी त्यांची उत्तरे शोधायचे काम आता भाजपा आणि संघ एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरी जाणार का, आकाश अंभोरे यांना संधी मिळणार कि पुन्हा एकदा तीच परिस्थिती मतदार संघावर येणार, कि भाजपा परिस्थिती चा विचार करून धोक्यात असलेली जागा संघ आणि समविचारी संस्था संघटनाच्या मदतीने वाचवणार आणी त्याला निमित्त मात्र आकाश अंभोरे ठरणार का हे येणारी वेळ ठरवेल.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *