छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील क्षेत्र सावळदबारा व भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र जाळीचा देव येथे 9 दिवस भाविक भक्त नामस्मरण करण्यासाठी येत असतात,घरचा तान तणाव,वाद वगेरे विसरून मानसिक शांतीसाठी जाळीच्या बाबांच्या नगरीत येत असतात,आलेल्या सर्व भाविकांची सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणाची व्यवस्था श्री क्षेत्र जाळीचा देव येथील मंदिराचे पुजारी बांधव करत असतात,यात ज्यांना ही अन्नदान करण्याची इच्छा असते ते ही अन्नदान करतात.
9 दिवस भक्तांसाठी वेगळ्या वेगळ्या आश्रमातील देवपूजा वंदन करण्यासाठी सोडलेली असते.
दुपारी बारा वाजता महाआरती होते,आरती झाल्यावर महाप्रसाद असतो,महाप्रसाद झाल्यावर ठीक 3 वाजता व्याख्यानमाला सुरू होते,ज्ञानी वक्ते व्याख्यान करतात,त्या व्याख्यान मालेचे सूत्रसंचालन प.पू.प.म.श्री.पांगरिकर बाबाजी व तसेच ई.श्री.शाम दादा शास्त्री विराट यांनी केले.तसेच या व्याख्यान मालेचे समारोपीय सत्र श्री चक्रपाणी आश्रमाचे संचालक,व्याख्यान मार्तंड,कीर्तन सम्राट,तसेच उत्कृष्ट सूत्र संचालक प.पू.प.म.श्री.चिचोंडीकर बाबाजी यांच्या व्याख्यानाने झाले.
तसेच पुजारी मंडळींनी 9 दिवस ज्या व्याख्यात्यांनी व्याख्यान दिले,अशा सर्वांचा सत्कार केला.
10 तारखेला सामूहिक पंचावतार उपहार होता.
सायंकाळी श्री क्षेत्र जाळीचा देव येथील तरुण युवा पुजारी मयुर पुजारी,बंटी पुजारी,सर्पमित्र निलेश पुजारी,स्वप्नील आंबेकर,यांनी सर्वांनी मिळून श्री क्षेत्र जाळीचा देव येथील बालगोपाल यांची एक नाटिका बसवली होती,कामाख्या निमित्त श्री चक्रपाणी प्रभू यांचा देह त्याग,त्याच श्री चक्रपाणी प्रभू यांनी गुजरात येथील विशाल देव पुत्र हरीपाल देवाच्या मृत शरीरात प्रवेश केला,त्यांचे पतित उठवले,ह्या नाटिकेचे सादरीकरण यश वाईंदेशकर मित्र मंडळ व सर्व बालगोपाल यांनी केले.
ही नाटिका सादर करणे मयुर पुजारी यांची कल्पना होती,त्यांनी ती अथक परिश्रम घेऊन सादर करून दाखवली,त्यात त्यांना बंटी पुजारी,सर्पमित्र निलेश पुजारी,स्वप्नील आंबेकर यांनी ही मदत केली.श्री क्षेत्र जाळीचा देव येथील तरुण पुजारी यांचा हाच उद्देश आहे की,आजच्या तरुण पिढीने व्यसन न करता परमेश्वराचे नामस्मरण करावे,जास्तीत जास्त स्थान वंदन करण्यासाठी जावे,कुठेतरी धर्माकडे वळण्याचा प्रयत्न करावा,हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
अश्या रीतीने श्री क्षेत्र जाळीचा देव येथील नवरात्र उत्सव आनंदात पार पडला.अशी माहिती बंटी किशोर पुजारी यांनी बोलताना सांगितले आहे.