सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
फर्दापूर व सावळदबारा परिसरात नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांची गाय केली जाणार नाही, काही अपरित घडल्यास फर्दापूर पोलिशांशी संपर्क करा, कोणावरही अन्याय केला जाणार नाही अशा सूचना पोलिस सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे फर्दापूर यांनी शांतता समितीच्या बैठकीत केली. आगामी काळात साजरे होणारे दसरा व दुगर्गादेवी विसर्जन व दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर समाजातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीच्या सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती. निमीत्ताने सावळदबारा परिसरात व फर्दापूर शहरामध्ये व परीसरामध्ये उत्सवाचे अनुषंगाने सामाजिक एकोपा आबाधीत राहवा या करिता सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या अध्यक्षतेखाली, उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांच्या उपस्थितीत हिंदू मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बनविण्यात आली. फर्दापूर शहरातील व सावळदबारा परीसरातील नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करुन कोणी वागल्यास व कायदा हातात घेवून गैर वर्तणुक केल्यास त्यावर कडक कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्यात येईल. घटना शहरामध्ये किंवा परीसरामध्ये घडू नये यासाठी आपसामध्ये सौर्दहाचे वातावरण रहावे तसेच हिंदु-मुस्लीम सामाजिक सौदाहर्य, एकोपा रहावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली व कायदेशीर मार्गदर्शन करुन सूचना दिल्या. तसेच आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव शांततेत पार पाडावे म्हणुन शांततेचे आवाहन सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्याकडून करण्यात आले. सदर शांतता समीती मिटींगला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती अंमलदार आनंद पगारे यांनी बोलताना सांगितले आहे.