गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
नारीशक्तीचा ओघ मंठा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटात सुरू असून तालुक्यातील शहरातील अनेक माता-भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आता शिंदे गटाकडे वळत आहेत. महिलांच्या आयुष्यात सुखा समाधानाचे दिवस शिंदे सरकारने आणले शिंदे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि गाव शिंदे सरकारवर विश्वास ठेवत आहे
मंठा तालुक्यातील उभारत युवा नेतृत्व उदयसिंह प्रल्हादराव बोराडे यांचा झंझावात तालुक्यातील 117 गावाने 92 ग्रामपंचायत पोहोचला असून एका मागून एक युवकांचा जत्था, वयस्कांचा आशीर्वाद पाठोपाठ आता महिलाही माता भगिनी यांचा कल शिंदे सरकारवर असून माझा भाऊ मुख्यमंत्री म्हणत अनेक महिलांचा प्रवेश केला. शहरातील तालुक्यातील तळागाळातील महाराष्ट्रातील
महिलांच्या कल्याणासाठी
शिवसेना शिंदे गट वचनबद्ध आहे. मंठा तालुका, शहर शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला बनवणार असे मंठा तालुकाप्रमुख उदय दादा बोराडे म्हणाले त्यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना महिला आघाडी उप जिल्हा प्रमुख कासाबाई शिरगुळे, तालुकाप्रमुख सुनीता देशमुख, सविता गवळी, इंदुबाई लहाने, संगीता खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य महिलांचा शिवसेनेत प्रवेश यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेशराव गणगे, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक गायकवाड,भीमराव वाघ, माजी सरपंच प्रल्हाद सांगळे,व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.