मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्रीमाई फुले, राजमाता अहिल्या देवी, मातोश्री रमाई या महान मातांचा जीवन संघर्ष,त्याग समर्पण, कार्य कर्तृत्व,आदर्श व प्रेरणा प्रमाण मानून गेल्या अनेक वर्षांपासुन समाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्याच्या शिंदी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीता रामेश्वर खरात यांची राज्यस्तरीय “महाराष्ट्र हिरकणी कर्तबगार महिला पुरस्कार -२०२४” साठी निवड करण्यात आली आहे.
अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था, भुसावळ, जिल्हा जळगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिला व पुरुषांना सन्मानपूर्वक विविध राज्यस्तरीय पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानाने पुरस्कृत केले जाते.. सदर पुरस्कारसाठी निवड झाल्याचे निवड पत्र नुकतेच संस्थेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे यांनी पाठविले आहे. सदर पुरस्कार भुसावळ येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यांत मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणार आहे. सुनीता रामेश्वर खरात यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दारुबंदी, व्यसन मुक्ती अभियान, मुलगा मुलगी एक समान, स्त्री भ्रूण हत्या, ग्रामस्वच्छता, महिला बचत गट चळवळ, महिला सक्ष्मीकरण, उद्योजक्ता विकास, आरोग्य, कृषी विकास,प्रशिक्षण कार्यक्रम इ. क्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कार्य करीत आहेत. यापूर्वी सुद्धा सुनीता खरात यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
“राज्यस्तरीय महाराष्ट्र हिरकणी कर्तबगार महिला पुरस्कार -२०२४” साठी निवड झाल्याने त्यांच्यावर संपूर्ण जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या पुरस्कार निवडीचे श्रेय त्या पती डॉ. रामेश्वर खरात,मुलगा रवी खरात, सून रोशनी खरात या परिवारातील सदस्यांसह सर्व महिला बचत गटाच्या महिला, बळीराजा संस्थेचे पदाधिकारी,राष्ट्रमाता जिजाऊ महिला शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी बंधू, समस्त गावकरी यांना देतात.