बुलढाणा
जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये असलेली नावीन्यपूर्ण उपक्रमशीलता ही एका प्रकारची संशोधनात्मक सृजनशीलता असून, या माध्यमातून आगामी नवीन शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटेल, असा विश्वास Gulabrao Kharat यांनी व्यक्त केला.
समग्र शिक्षाअंतर्गत स्थानिक जिल्हा नियोजन सभागृहात ‘झेप – ZP’s Educational Pioneer’ या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सुमारे १५० नाविन्यपूर्ण उपक्रमशील शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात बोलत होते.
यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी B. M. Mohan, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य Dr. Jagram Bhatkar, प्राथमिक शिक्षणाधिकारी Vikas Patil, माध्यमिक शिक्षणाधिकारी Anil Akal, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी Dr. Vaishali Thag, ज्येष्ठ अधिव्याख्याता Dr. Maruti Gaikwad, व्याख्याते Gajanan Raut, उपशिक्षणाधिकारी Anil Devkar तसेच Sheikh Aqeel आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांची उपक्रमशीलता म्हणजे सृजनशील संशोधन
पुढे बोलताना गुलाबराव खरात म्हणाले की, जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले शिक्षक हे स्पर्धा परीक्षांमधून सेवेत रुजू झालेले असून, शहरालगतच्या गावांपासून ते दुर्गम भागांपर्यंत विविध परिस्थितीत ते काम करतात. अशा परिस्थितीतही ते कर्तव्यपरायणतेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात.
शिक्षकांनी आपल्या शाळांमध्ये राबविलेले हे उपक्रम म्हणजे सृजनशील संशोधनात्मक अभ्यास असल्याचे सांगून, या सृजनशीलतेला बळ देण्यासाठी ‘झेप’ ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून एका शाळेतील यशस्वी उपक्रम इतर शाळांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक परिवर्तनाचा विश्वास
प्रास्ताविक करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. शिक्षकांना आपले शैक्षणिक कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडता यावे यासाठी प्रशासन शिक्षकस्नेही होण्याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थीस्नेही दृष्टिकोन स्वीकारून जिल्हा परिषद शाळांचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले, तर लोणार येथील गजानन राऊत यांनी ‘प्रेरणा’ विषयावर उद्द्बोधन केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील निवडक शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी केले, तर उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी आभार मानले
Users Today : 46