मलकापूर
विकासकामांच्या नावाखाली शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत उमाळी येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी K. M. Chaudhary यांच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे. या प्रकरणी चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी Sunita Ingle आणि Sunil Vai यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
आंदोलकांच्या आरोपानुसार, चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात १५ व्या वित्त आयोगासह विविध शासकीय निधीतून गावात विकासकामे केली, मात्र ही कामे कागदावर दर्जेदार दाखविण्यात आली असून प्रत्यक्षात ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंदाजपत्रकाला हरताळ फासून शासकीय निधीचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रमाई घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप
या प्रकरणात विशेषतः Ramai Awas Yojana अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. नियमांची पायमल्ली करत लाभार्थ्यांकडून आर्थिक व्यवहार (लाच) घेऊन अपात्र व्यक्तींना घरकुले मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसऱ्याच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर खोटा ‘८ अ’ उतारा तयार करून घरकुल मंजूर करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला.
चौकशी व कारवाईची मागणी
२०२३ ते २०२५ या कालावधीत नियमबाह्य पद्धतीने घरकुलाचा लाभ देण्यात आल्याचा आरोप करत संपूर्ण विकासकामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच संशयास्पद लाभार्थ्यांचे पुढील हप्ते थांबवून निधीचा अपव्यय रोखावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १९९, २००, ४६८ आणि ४२० अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन केले जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
Users Today : 46