खामगाव
साहित्यरत्न लोकशाहीर Annabhau Sathe यांच्या रेल्वे स्टेशनजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी २५ मार्चपासून खामगाव नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
ही आंदोलनात्मक भूमिका Annabhau Sathe Smarak Samiti यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समाजबांधवांच्या सहभागातून घेण्यात आली आहे. ✊
समितीच्या वतीने यापूर्वी २३ मार्च रोजी Khamgaon Municipal Council येथे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय निधीतून सुशोभीकरण करावे, तसेच नगर परिषदेकडून उभारण्यात येत असलेल्या नवीन व्यापारी संकुलाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र या मागण्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे समाजबांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजेपासून दिवस-रात्र साखळी उपोषण करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
या आंदोलनात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Users Today : 46