गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
पाण्याचा वास आल्याने नाविकांना आला संशय.
जालना: शहरातील नूतन वसाहत भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभात मतदेह आढळून आल्याने एकच जालना शहरात एकच खळबळ उडाली. आ. कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जलकुंभातील पाणी काढण्यात येऊन ते स्वच्छ करण्यात येत असल्याचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले.
जायकवाडी जलाशयातून जालन्याला जलवाहिनीद्वारे पाणी, पाणी पुरवठा केला जातो. याच जलवाहिनीतून पाणी नूतन वसाहत भागातील विसावा शाळेजवळ पालिकेच्या वतीने जलकुंभ उभारण्यात आला आहे. यात जलकुंभामध्ये पाणी साठवून ठेवले जाते. त्यानंतर चक्री पद्धतीने शहरातील विविध भागांना ते पुरविले जाते. दोन ते तीन दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन
परिसरातील जमुनानगर, सरस्वती कॉलनी, विद्युत कॉलनी व इतर भागांना याठिकाणाहून पाणीपुरवठा करण्यात आला होता.
जमावाला शांततेचे आवाहन
पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली असता समजलेल्या प्रकाराने खळबळ उडाली. सदरील प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन
संतप्त झालेल्या जमावाला शांततेचे आवाहन केले व नागरिकांना धीर दिला. महापालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्याशी अंबेकर यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला
व पुढील कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. जमलेल्या नागरिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासमोर नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करून नगरपलिकेला जाब विचारावा आसी मागणी केली.