मेहकर:-(कार्यालय प्रतानिधी)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा उद्या सायंकाळपर्यंत होण्याची दाट शक्यता असून आचारसंहिता लागू होणार असे चित्र दिसत असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रीमंडळाने कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्र राज्यातील काही निर्णय घेतले असून सदर निर्णय सर्वजनहिताचे आहेत किंवा नाहीत हे मात्र येणारा काळच ठरवेल महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या शासनाने झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतल्या प्रमुख पाच (५) प्रवेश मार्गावर हलक्या वाहनांसाठी घेण्यात येणारा टोल पुर्णपणे माफ केला असून याची अंमलबजावणी मध्यरात्री १२ वाजेपासून करण्यात येणार आहे
राज्यातील आगरी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.
समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांसाठी करिअर ॲडव्हान्समेंट स्किम सुरु केली आहे.
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारीत मान्यता देण्यात आली आहे.
वैजापुरच्या शनीदेवगाव बंधा-यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित केली आहे.
पाचपाखाडी येथील जमीन ठाणे महानगर पालिकेच्या प्रशासकीय भवनासाठी दिली आहे.
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)२.० राबविण्यात येणार आहे.
पुणे मेट्रो रेल टप्पा -२ मधील रेल्वे मार्गिकांच्या कामांना मान्यता दिली आहे.
किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्ज सव्याज माफ करण्यात आले आहे.
अडचणितील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकित कर्ज माफ करण्यात आले आहे.
मिरजच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे दिली आहे.
खंड क्षमापीत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा ठेवला आहे.
अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट तयार करण्यात आला आहे.
‘उमेद’ साठी अभ्यासगट तयार केला आहे.
कौशल्य विद्यापिठास रतन टाटा यांचे नाव देण्यात आले आहे.आदी निर्णयाच्या घोषणा करण्यात आली असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले सर्व निर्णय जनहिताचे आहेत किंवा नाहीत हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे…
Users Today : 17