मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील विविध समाजातील नागरिकांसाठी शासनाने विविध योजना लागू केल्या असून यामध्ये प्रामुख्याने मेंढी पालन करणा-या धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ट्रॅक्टर,ट्रॉली,कॉटन ताडपत्री इत्यादी साहित्य अनुदानावर वाटप करण्यात येते तरी बुलडाणा जिल्ह्यातील मेंढी पालन करणा-या मेंढपाळ बांधवांना उपरोक्त साहित्याचे तात्काळ वाटप करण्याची मागणी बुलडाणा जिल्ह्याचे यशवंत सेना संपर्क प्रमुख आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी केले आहे.

उपरोक्त साहित्यामुळे धनगर समाज बांधवांना मोठ्या प्रकारची मदत होऊन त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासास चालना मिळते मात्र बुलडाणा जिल्ह्यात अनुदानावरील साहीत्याचे वाटप न करण्यात आल्याने जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांचा विकास खुंटला असून त्यांना वेगवेगळ्या अडचणिंचा सामना करावा लागत असून नुकत्याच शेगाव व खामगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेगाव,काळखेड, आडसुळ इत्यादी गावातील मेंढपाळ बांधवांना नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला तोंड द्यावे लागले तसेच त्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाल्याने या परिसरातील मेंढपाळ बांधवांना शासनाने आर्थिक मदत सुध्दा करावी व शासनाच्या अनुदान योजनेतील साहित्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे अशी मागणी बुलडाणा जिल्हा यशवंत सेनेचे संपर्कप्रमुख गजानन बोरकर यांच्यासह किरण कोळपे, समाधान कोळेकर, संदिप थोरात,गोपाळ हटकर, प्रविण थोरात,तानाजी बिचकुले,रवि थोरात,बंडू कोळपे, विकास थोरात, समीर हाके आदींनी केली आहे
Users Today : 17