ग्रामदेवता शितला माता येथील महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा :-विनोद भिसे

Khozmaster
1 Min Read
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
मेहकर नगरीचे आराध्य दैवत ग्रामदेवता शितलामाता मंदिर दरवर्षी नवरात्रात नऊ दिवस दुर्गामातेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन करण्यात येते तसेच मेहकर शहरातील दुर्गा विसर्जनाच्या दिवशी भव्य अश्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुध्दा मंगळवारी १५ ऑक्टोंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मेहकर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या महाप्रसादास अगत्याने
येण्याची विनंती आयोजक तथा शिवचंद्र मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद भिसे यांनी केली असून महाप्रसादाचे वाटप दूपारी ०१:०० वाजता सुरु होणार असून रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगत मेहकर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री ग्रामदेवता शितलामाता नवरात्री उत्सव मंडळ व शिवचंद्र मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद भिसे मेहकर यांनी केले आहे
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *