लघु उद्योग मार्गदर्शन फिरत्या रथाचे उदघाटन करीत उबाठाचे नेते सिद्धार्थ खरातांची अप्रत्यक्षरीत्या विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात

Khozmaster
2 Min Read

मेहकर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरसावले सिद्धार्थ खरात

मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
उत्कर्ष फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षी संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कृषी, दुग्ध उत्पादक व्यवसाय अशा विविध क्षेत्रात विशेष करुन शेतकरी हितासाठी विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी मेहकर विधानसभा मतदारसंघातील मेहकर व लोणार तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी पुढाकार घेऊन उत्कर्ष फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ खरात यांनी “स्कील ऑन व्हील”ह्या उपक्रमाला सुरुवात केली असून नुकतेच उबाठाचे उपजिल्हाप्रमुख प्रा आशिष रहाटे यांच्या हस्ते लघु उद्योग फिरत्या मार्गदर्शक रथाचे उदघाटन जानेफळ चौकातील उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालया नजिक करण्यात आले याप्रसंगी उबाठाचे नेते सिद्धार्थ खरात, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शहरप्रमुख युवा उद्योजक किशोर गारोळे,युवासेना तालुकाप्रमुख ॲड आकाश घोडे, पत्रकार राजेश देशमाने, ॲड संदिप गवई,लोणी गवळी सर्कल प्रमुख भागवत बोरकर, आदींची उपस्थिती होती याप्रसंगी बोलतांना प्रा आशिष रहाटे म्हणाले की मागील तीस वर्षांपासून मेहकर विधानसभा मतदारसंघात ज्यांचे एकछत्री राज्य सुरु आहे त्यांनी सुध्दा आजपर्यंत मेहकर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन स्वावलंबी बनविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत मात्र सिद्धार्थ खरात यांनी उत्कर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून लघु उद्योग मार्गदर्शन फिरत्या रथाद्वारे मतदारसंघातील बेरोजगार युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पुढाकार घेतला या उपक्रमाचा फायदा शाळा, कॉलेज, आणि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी तसेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना देखील कौशल्य शिक्षणाची तोंडओळख करुन दिली जाणार आहे त्यामुळे या कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराची अमूल्य संधी सिद्धार्थ खरात यांनी उपलब्ध करुन दिले असून मेहकर विधानसभा मतदारसंघातील युवक युवतींनी या संधीचे सोने करण्याचे आवाहन रहाटेंनी केले .
मेहकर विधानसभा मतदारसंघातील उद्योग व्यवसाय सुरु करणा-या युवकांना सर्वतोपरी सहकार्य करणार:-सिध्दार्थ खरात
याप्रसंगी बोलतांना सिद्धार्थ पवार म्हणाले की या भागातील नवीन उद्योग, व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या तरुणांना, शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन करणाऱ्यांना त्यांचे कौशल्य ओळखून सोयीस्कर व्यवसाय आणि ईतर पर्यायी व्यवसाय वाढीसाठी योग्य ते मार्गदर्शन तसेच या भागात दुग्ध व्यवसाय,गाई पालन, म्हशी पालन, मत्स्यपालन, खेकडापालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती व इतर शेतीपुरक व्यवसाय वाढीसाठी सर्वतोपरी आवश्यक ते सहकार्य करण्याचे अभिवचन सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिले
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *