तीर्थक्षेत्र विकास योजनेतून भाविकांसाठी सोईसुविधा विस्तारीकरणाचे ध्येय साध्य होणार:-आमदार संजय रायमुलकर

Khozmaster
3 Min Read
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय लोकहिताचा व मौलिक असून शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून भाविकांसाठी सोयी सुविधा विस्तारीकरणाचे ध्येय निश्चितपणे साध्य होणार आहे. लोणार, मेहकर तालुक्यातील इतरही तीर्थस्थळांच्या विकासासाठी यापुढेही आपण प्रयत्नशील राहणार आहोत असे विचार आमदार संजय रामुलकर यांनी व्यक्त केले.
           आमदार रायमुलकर यांच्या प्रयत्नातून शासनाच्या तीर्थस्थळे विकास योजनेतून साडे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यास झाला असून सोनाटी येथील म्हाळसाक्रांत मल्हारी खंडोबा संस्थानला ३ कोटी ८१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे .त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थांनतर्फे आमदार संजय रायमुलकर यांच्या सत्काराचे आयोजन १४ आक्टोंबर रोजी  सायंकाळी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव बदर होते. सत्काराला उत्तर देताना आमदार रायमुलकर बोलत होते.
               शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख समाधान साबळे, रामेश्वर बोरे ,राजीव घनवट, ऋत्विक महाराज गिरी, मदनसन चनखोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थांनचे पंडितराव हुले ,दिलीप अस्तरकर, दिनकर बदर, उत्तमराव कातडे ,शिवाजी देवकर, भारत नालेगावकर  आदींनी संजय रायमुलकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. संजय बदर ,गजानन कातडे, कुंदन हुले, योगेश फुके, केशव देवकर, राजाराम वाटसर, विठ्ठल हुले, एड. समाधान कटारे ,अमोल बदर ,सरपंच रवींद्र बदर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
            आपल्या भाषणात आमदार रायमुलकर पुढे म्हणाले की,तीर्थक्षेत्र विकास योजनेचा जिल्ह्यात सर्वाधिक निधी मेहकर मतदार संघाला प्राप्त करुन घेण्यात यश मिळाले आहे. खंडोबा संस्थान येथे ३ कोटी ८१ लाख रुपयांचे निधीतून प्रसादालय ,वाहनतळ, विद्युतीकरण  भाविकांसाठी आवश्यक असलेली इतर कामे होणार आहेत. तालुक्यातील देळप येथील बगदालभ्य ऋषी संस्थांन तीन कोटी ६२ लाख ,दुधा ब्रह्मपुरी येथील ओलांडेश्वर संस्थांनला साडेचार कोटी, तर देऊळगाव माळी येथील पांडुरंग संस्थानला अडीच कोटी रुपये या योजनेतून मंजूर करून घेतले आहेत. भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करणे, हा या पाठीमागचा उद्देश आहे.
                 मेहकर रिसोड रस्ता सुधारणीकरणासठी १७५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गोहगाव रस्त्याचे कामही मंजूर झाले आहे, यात दोन पूल ही प्रस्तावित करण्यात आले आहे. मतदारसंघातील जनता हे माझे दैवत असून त्यांच्यासाठी अहोरात्र राबण्याचे माझे ध्येय आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, एक रुपयात पिक विमा ,गरीब कुटुंबांना तीन सिलेंडर मोफत, ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत या सोबतच इतर योजना आणल्याने मध्यमवर्गीयांचा मोठा फायदा झाला आहे, असेही ते म्हणाले. मेहकर मतदार संघात गतकाळात ४ हजार कोटींची विकास कामे करण्यात आल्याची माहितीही यावेळी आमदार रायमुलकरांनी दिली. या कार्यक्रमाला गजानन कातडे,  संतोष बदर, कुंदन हुले, संजय बदर ,पवन बदर, विलास कटारे ,अजिंक्य बदर ,किशोर अस्तरकर, अतुल बदर, नंदू कटारे ,अनिकेत हुले,  योगेश फुके ,भागवत हुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिलीप अस्तरकर यांनी तर विलास कटारे यांनी आभारप्रदर्शन केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *