मेहकर विधानसभा मतदारसंघाला लागलेय बंडखोरीचे ग्रहण

मेहकर:-(अविनाश लाड)
मेहकर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे शिलेदार विद्यमान आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी काल २४ आक्टोंबर रोजी निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून महायुतीतील मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख प्रा प्रकाश गवई यांनी “मी येतोय तूंम्ही पण या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी”असे भावनिक आवाहन करीत बंडखोरीचे रणशिंग फुंकले असून मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ वाजता नगर परिषदेच्या स्वातंत्र्य मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सिध्दार्थ खरातांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे यांनीही सिध्दार्थ खरात यांच्यावर बेछूट आरोप करीत तसेच पक्षश्रेष्ठींना निष्ठेशी काहीही देणेघेणे नसल्याचे सांगून जाहीरपणे बंडखोरी करण्याचे संकेत दिल्याने त्यांनी सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल केला तर यात आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नको एकंदरीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मेहकर विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले असे म्हंटल्यास यात काही वावगे ठरणार नाही प्रा प्रकाश गवई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीचे उमेदवार आमदार डॉ संजय रायमुलकरांपुढील समस्या वाढणार असून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे २९ आक्टोंबर ही निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मेहकर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, आझाद समाज पार्टी या पक्षाच्या उमेदवार सुध्दा आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता असल्याने यंदा मेहकर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची गडद शक्यता नाकारता येणार नाही.. यंदा स्वतःच्या मानसन्मानासाठी व महायुतीतील मित्र पक्षांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणूकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार प्रा प्रकाश गवईंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते कुणाला मारक ठरतात व कुणाला तारक ठरतात हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.
Users Today : 17