भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या… आज सिद्धार्थ खरात भरणार अर्ज… सर्वांनी हजर राहून आशीर्वाद द्यावा असे आवाहन.

Khozmaster
1 Min Read

भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या…

आज सिद्धार्थ खरात भरणार अर्ज… सर्वांनी हजर राहून आशीर्वाद द्यावा असे आवाहन.

आज महाराष्ट्रातील शेतकरी वाईट परिस्थितीत आहे.प्राण पणाला लावून पिकवलेल्या मालाला नैसर्गिक संकटापासून वाचवले, पण सुलतानी संकट असलेल्या सरकारने सोयाबीन आणी कापूस यांना सोडून इतर सर्व गोष्टीचे भाव वाढवले आहेत.त्यामुळे अशा दुहेरी संकटात सापडलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी,सामान्य जनता, कष्टकरी, म्हणून, शेतमजूर या प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे.

बाबासाहेबांच्या संविधानामध्ये प्रचंड प्रमाणात मोडतोड करून बहुजनाचा आवाज बंद करणारे आणी रोहित वेमूला सारखे बहूजन विद्यार्थी शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना प्रचंड त्रास देऊन फाशी घ्यायला लावणाऱ्या या भ्रष्ट आणी बहुजनद्रोही सरकारला धडा शिकवण्याकरिता आणी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कायम प्रयत्नशील असेल.सगळ्या भय,भ्रष्टाचाराने पीडित आणी महागाई व हुकूमशाहीने त्रासलेल्या बहुजनाचा आवाज म्हणून आज 28 ऑक्टोबर 2024 ला विधानसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करीत आहे.तरी मतदारसंघातील तमाम जनतेने माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मेहकर येथे उपस्थित रहावे आणि आपले शुभ आशीर्वाद द्यावे..असे आवाहन माजी सनदी अधिकारी तथा महाविकास आघाडीचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी केले आहे.

0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *