जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.

Khozmaster
2 Min Read

जळगाव:- ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने जळगाव शहर हादरले आहे. सोनाली दिपक दाभाडे (वय ३६) आणि तेजस्विनी दीपक दाभाडे (वय ८) असे मयत आई व मुलीचे नाव आहे.याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर येथे सोनाली दाभाडे या पती दीपक दाभाडे आणि मुलगी तीन मजली इमारतीत दोन भावांसह राहतात. पती दीपक दाभाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान पती आज २४ रोजी सकाळी भावांसह नातेवाईक वारल्यामुळे भुसावळ येथे गेलेले होते.

दरम्यान त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची मुलगी तेजस्विनी हे घरी एकटे होते. त्यांनी सकाळी ९ वाजेनंतर मुलीला एका स्कार्फने गळफास देऊन स्वतः सोनाली दाभाडे यांनी दुसऱ्या स्कार्फने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पती दीपक दाभाडे व परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा घटना उघड झाली. तिसऱ्या मजल्यावर पती गेले असता आतून दरवाजा लावून घेतलेला होता. तेव्हा दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह दिसताच पती दीपक यांनी मोठा आक्रोश केला.नातेवाईकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *