मंठा 🙁 गजानन माळकर पाटील )
जालना नांदेड महामार्गावरचा मंठा तालुक्यातील केंधळी शिवारातील विठ्ठला पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज समोरच रोडच्या मधोमध
महाकाय खड्डा पडल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून, मोठा अपघाताची शक्यता आहे. त्यातथ केंधळी पुलावरील रस्त्यांच्या दोन तुकड्यांना जोडणान्या ठिकाणीही खड्डे पडले असून, या पुलाची झालेली दुरवस्था पाहता अनेकांच्या तोंडून आपसूकच हे राम’ हा शब्द बाहेर पडून बांधकाम विभाग आणि संबंधित गुत्तेदार व प्रशासनाला शिव्यांची लाखोली वाहिली
जात आहे. गत काही वर्षात दुचाकी, चारपाकी आणि तीनचाकी.
वाहनांच्या किंमती प्रबंड वाढल्या असून, ५० ते ६० हजारात मिळणारी दुषाकी आजघडीला सव्वा लाखाच्या घरात गेली आहे. त्यासोबतच ७-८ लाखाला मिळणाऱ्या चारचाकीची किंमत १५ ते २० लाखांवर पोहोचली असून, ऑटोरिक्षाच्या किंमतीही दुप्पट झाल्या आहेत. त्यासोबतच बाजारात नाजुक अशी इलेक्ट्रीक वाहनेही दाखल झालेली आहेत. हा बदल होत असतांनाच या वाहनांच्या प्रमाणात शहरात दर्जेदार रस्ते उपलब्ध
असने ही काळाची गरज आहे. मात्र, रोडची अवस्था पाहता ते पार मोडकळीस आल्याचे स्पष्ट होते. प्रामुख्याने वाटूरफाटा ते देवगाव फाटा दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे हे येमाची भूमिका निभावत आहेत
सातत्याने वरदळ असून, या पुलाच्या मधोमध व विठ्ठला पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज समोरच्या मधोमध खड्या आसलेल्यान वाहनधारकांना अंदाज येत नाही
मोठा अपघाताची शक्यता आहे वर्षापुर्वी झालेल्या या रोड वरती आत्तापर्यंत 143 अपघातात आपला जिव गमावला आहे व कित्तेक जणाणा अपंग आलेले आहे तरी पण संबंधित विभागला दुरुस्त करता आलेला नाही. ते खड्डे कुणालाही तोंडात बोट घालायला लावणारे आहेत ..
महाकाय खड्यांमुळे वाहधाकरकांना म्हणावे लागतेय बाप रे वाचलो तो खड्डा देताहेत मोठ्या अपघाताला आमंत्रण.
0
8
9
4
5
6
Users Today : 22
Leave a comment