मंठा 🙁 गजानन माळकर पाटील )
उपविभागीय अधिकारी, परतूर यांच्या मार्फत रोजी दिनांक : ६ जानेवारी २०२५, साखर आयुक्त साखर आयुक्त कार्यालय, पुणे व जिल्हाधिकारी जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन तक्रार करून मागणी करण्यात आली तक्रारीत पुढे म्हटले आहे, की सर्फल टॅंक जुन्या असल्यामुळे स्पोट होऊन अपघातात मृत्यू झालेल्या देशमुख व पाखरे या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख आर्थिक मदत व जबाबदारांवर खुनाचे गुन्हा दाखल झाले पाहिजेत म्हणून आपले लक्ष या विषयाकडे वेधू इच्छितो की जालना जिल्ह्यातील बागेश्वरी साखर कारखान्यामध्ये मागील महिन्यात सर्फल टॅंकच्या स्फोटामुळे अपघात झाला. या घटनेत श्री. देशमुख व श्री. पाखरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर प्रकरणात सर्फल टॅंक जुना असून त्याची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे हा स्फोट झाला आहे.
कारखान्याचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक हे या घटनेला जबाबदार आहेत, कारण त्यांनी वेळेवर टॅंक बदलण्यासाठी किंवा त्याची योग्य दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. यामुळे निष्पाप व्यक्तींनी आपले प्राण गमावले आहेत.
या परिस्थितीत संबंधित मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी. याशिवाय, या प्रकरणाची सखोल चौकशी करून बागेश्वरी साखर कारखान्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
जर याबाबत योग्य तो निर्णय व कारवाई तातडीने करण्यात आली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन उभे करण्यात येईल व साखर कारखाना बंद करण्याची वेळ येईल. तरी, या प्रकरणात त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, परमपूज्य मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो, म्हणून प्रशासनाने दखल घेऊन गंभीर स्वरूपाची कारवाई करावी शेवटी असेही प्रकाश सोळंके जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जालना यांनी मागणी केली आहे.
Users Today : 22