मंठा 🙁 गजानन माळकर )
मंठा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ मीराताई बालासाहेब बोराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे सादर केला. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.पाटील बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मंठा शहरात अनेक विकासाची कामे करण्यात आली.सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी मंठा शहरात रस्ते, पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता या मूलभत प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिले. शासनाने नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ रद्द केला होता. मात्र, तरीही त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नगराध्यक्षपदाचे कामकाज करण्यासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही म्हणून आपला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा सोमवार ता. सहा रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
सौ मीराताई बालासाहेब बोराडे यांचा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा……
0
8
9
4
5
6
Users Today : 22
Leave a comment