मेहकर/प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या मौजे लोणीगवळी येथे आमदार सिद्धार्थ खरात यांचा जाहिर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन येथिल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे होते ते बोलताना आपल्या भाषणातून म्हणाले की आमदार सिद्धार्थ खरात हा माणूस माझ्या ग्यारंटीचा आहे त्यांनी माझ्याकडे जवळपास सात वर्ष काम केले, ते माझ्या मतदार संघाचे आहेत, त्यांना ३० वर्षाचा प्रशासकीय अधिकारी पदाचा अनुभव आहे, त्यांनी उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे,त्यांचा दुधाचा प्रकल्प सुरू आहे, अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे आणि मेहकर लोणार मतदार संघातील लोकांनी योग्य उमेदवार दिलाय, त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेस मी आलो होतो, त्या जाहीर सभेत मी स्वतः सांगितले होते सिद्धार्थ खरात यांना निवडून द्या त्यांच्या पुढील कामाची ग्यारंटी मी घेतो आणि त्या वेळी मी ग्यारंटी दिली होती, आणि आपली ग्यारंटी काही मोदी ग्यारंटी नाही असा टोला सुद्धा त्यांनी त्या वेळी विरोधकांना मारला होता तसेच हे सरकार फेल आहे, त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही असेही माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आपले मत मांडले,
तर सत्काराला उत्तर देताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी जुनी आठवण काढत माझ्या गावाचा रस्ता सुधा डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांनी बनविला आहे, मी त्यांच्याकडे काम केले आहे तेच माझे राजकीय गुरू आहेत, आणि त्यांना या ठिकाणी शब्द देतो साहेब मेहकर लोणार मतदार संघातील विकासासाठी मी कधीही माघे पुढे पाहणार नाही,महाविकास आघाडीच्या वतीने हा माझा भव्य नागरी सत्कार सोहळा बघून माझे उर भरून आलं आहे.लोणी गवळीच्या जनतेने मला जे भरभरून प्रेम दिलं त्याचा मी शतशः ऋणी आहे,याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस पार्टी श्यामभाऊ उमाळकर, जालिंदर भाऊ बुधवत जिल्हाप्रमुख शिवसेना, आशिष भाऊ राहाटे उपजिल्हाप्रमुख शिवसेना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण दादा घुमरे, काँग्रेस नेते ऍड.अनंतराव वानखेडे यांनी सुध्दा आपल्या भाषणातून विविध विषयांवर चर्चा मंथन घडवून आणले आणि सर्वणुमते येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व डॉ राजेंद्र शिंगणे यांनी करावे असे साकडे घातले, या वेळी विचार मंचावर शिवसेना शहर प्रमुख किशोर भाऊ गारोळे, तालुकाध्यक्ष निंबाभाऊ पांडव, दत्ताभाऊ घनवट तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,ऍड.आकाश घोडे तालुका अध्यक्ष युवा सेना, जि. प. सदस्य देवानंद भाऊ पवार, जि. प. सदस्य संजय भाऊ वडतकर, माजी सभापती पं स.सागर पाटील, प्रदीप बिल्होरे पाटील,सेवादलचे शैलेश बावस्कर, भागवत बोरकर, सेवादलच्या आरती दिक्षित यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी व लोणी गवळी गावचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर पाटील यांनी तर आभार शैलेश बावस्कर यांनी मानले
Users Today : 18