मेहकर : – ( शहर प्रतिनिधी )
मेहकर पोलीस निरीक्षक घुगे यांनी पदभार स्वीकारला तेव्हा पासून शहरातील व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी 10 वाजेपर्यंत आपली व्यवसाय सुरू ठेवण्याचा कायदेशीर जाहिरनामा मेहकर पोलिसांनी साहेबांच्या आदेश नुसार काढला आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्ग 10वाजताच आपली प्रतिष्ठान बंद करीत आहेत यामुळे वर्दळीच्या शहरात शुकशुकाट दिसून येत आहे.
30 डिसेंबर ची ‘ती ‘ कारवाई उपविभागात चर्चेचा विषय ठरला आहे. सुलतानपूर येथे बनावट नोटा पाऊस टोळी बलेनो कार क्र टीएस 09 एफव्ही 6227 मधुन बिबी पोलिस स्टेशन कडे जात असल्याच्या संशयावरून पोलिस कर्मचारी सुनील नागरे,जाधव यांनी सिनेस्टाईल 20किमी अंतराचा पाठलाग केला. बिबी पोलीसांनी नाकेबंदी करून चिखला गावाजवळ 5 आरोपी बनावट नोटांच्या पिशवी सह पकडून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय मेहकर येथे आणण्यात आले . उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्यामसक्ष पुढील तपास आपण करणार असल्याची ग्वाही ठाणेदार घुगे यांनी दिली. 35 तास आरोपी तपासात असताना पहिल्या दिवशी त्यांना सोडून देण्यात आले, परंतु दुसऱ्या दिवशी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. ठाणेदार घुगे यांची ही कारवाई संशयास्पद असल्याचे लक्षात येताच आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी यासंदर्भात लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे दिली आहे. तक्रारीत नमूद अशया नुसार पोलिस यंत्रणा रात्री अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करता हप्तेखोरीवर जोर देत आहे, परिसरातील भंगार विक्री खरेदी दुकानदारांना हप्ता मागणी करीत असल्याचे सुद्धा नमुद केले आहे.
पोलिस निरीक्षक घुगे यांच्या अशाप्रकारे वागणुकीमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक समक्ष अधिकारी यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती परिसरातील टावरवर चढुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी दिला आहे.
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परची माहिती साठी पोलीस खबरी सक्रीय करण्यात आले आहे. सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार लाखो रुपयाचा मलीदा जमा केला जात आहे.गुटखाविक्रीधारक टपरीधारकांना अर्थासाठी दंडुकेमहाराजचे दर्शन होत आहे…!
30 व 31 डिसेंबर बनावट नोटा पाऊस प्रकरणी झालेली कारवाई संशयास्पद असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. अवैध धंदे बंद मात्र अवैध कमाईचा सपाटा सुरू केला आहे.