मेहकर/प्रतिनिधी
मेहकर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात प्रचंड बहुमताने निवडून आल्या नंतर पहिल्यांदाच उकळी सुकळी येथे त्यांची पेढे तुला व घोड्यावरून भव्य मिरवणूक काढून नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या सत्काराला उत्तर देताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी विरोधकांवर चांगलीच बोचरी टीका केली ते म्हणाले की माझ्या डोक्यात अजून आमदारकी येईना आणि त्यांच्या डोक्यातली आमदारकी काही जाईना ते अजूनही रखडलेल्या कामांचे अनधिकृतपने उद्घाटन करीत जनतेत मिरवत आहेत.
इतक्या दिवस विकासाच्या नावाने बोंब ठोकली आणि केवळ जाती पातीचे राजकारण करता,आत्ता पर्यंत दहशतवाद,दडपशाही,गुंड शाहीने राजकारण केले आता मात्र या पुढे गुंड प्रवृत्ती, दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, येथील जनतेने जातीवाद संपुष्टात आणला मला तुम्ही निवडून दीले त्याचा आनंद आहे, पण त्याही पेक्षा जास्त आनंद आहे तो म्हणजे या मतदार संघाला जातीयवादाचा लागलेला कलंक तुम्ही पुसून काढला.
आता आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायती ,जास्तीच जास्त निवडून आणायच्या आहे, आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे, कोणी आडवा आला तर त्याला जसेच्या तसेच उत्तर दिले जाईल केंद्रात आणि राज्यात कोणाचेही सरकार असले तरी मात्र मेहकर मतदार संघात आपले राज्य आहे,घाबरण्याचे कारण नाही, तसेच रखडलेल्या कामांची चौकशी करण्यात येईल कोणालाही सोडणार नाही. असाही इशारा आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिला या कार्यक्रमाचे आयोजन अमोल बोरे, दसरथ बोरे, सुरेश सोनवणे, राजू धांडे, पंजाब जाधव, अशोक सवडतकर, अनिल बोरे यांनी केले होते तर सचिन नवले, नागेश नवले, रामेश्वर सासवडकर,सतीश सासवडकर, देविदास नालेगावकर,गणेश नवले,माजी सरपंच अनंता शिल्लोडे,किशोर तृकमाने, तृकमाने,बबन तृकमाने, सुभाष मोरे,गजानन मोरे, तुकाराम तृकमाने यांची उपस्थिती होती,