जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ‘त्या ‘ प्रकरणी दखल घ्यावी – गजानन बोरकर

Khozmaster
1 Min Read

विशेष पोलिस महानिरीक्षक यांना दिली तक्रार

मेहकर – : ( शहर प्रतिनिधी )

जिल्ह्यातील बहुचर्चित नोटा प्रकरणी टावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक यांना वरील घटना क्रमामध्ये दि.16 जानेवारी रोजी तक्रार दिली आहे.
पोलिस दलाची पारदर्शक कारवाई अपेक्षित आहे. अथवा अमरावती आयुक्तालय हद्दीमध्ये टावरवर चढुन आंदोलन करण्यात येणार असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सविस्तर वृत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेला दोन आठवडे उलटुन गेली आहे तरी सुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी यांची चौकशी कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पानसरे यांच्या कडे याबाबत 10 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली परंतु तिकडेसुद्धा आठवड्यात याबाबत ठोस हालचाली आढळून आल्या नाहीत . या अनुषंगाने बोरकर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती यांना सदर प्रकरणात भेटून सविस्तर माहिती दिली असल्याचे कळते, सदर बाबतीत अमरावती दरबारात काय हालचाली होणार हे आगामी काळात कळेल परंतु लवकरच याबाबत काही ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन नक्कीच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *