मेहकर:-(एजाज खान)
मातोश्री एज्युकेशन सोसायटी मेहकर द्वारा संचालित सत्यजित इंटरनॅशनल इंग्लिश (CBSE) स्कूल मेहकर व सत्यजित ग्रुप ऑफ कॉलेजेस,मेहकरच्या वार्षिक स्नेहसंमेलन झेप २०२५ चे उद्घाटन दिनांक १६ जानेवारी रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष श्याम उमाळकर कार्यक्रमाचे उद्घाटक मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात,तसेच दीप प्रज्वलन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजीद खान पठाण तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव भूषण मिनासे,राजू उमाळकर,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे, प्रकाश तायडे,मेहकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष देवानंद पवार,अकोला कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रशांत वानखेडे,वानखेडे, शांतीलाल गुगलीया, मेहकर कॉंग्रेस शहराध्यक्ष पंकज हजारी,लोणारचे माजी नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे, माजी नगरसेवक बादशहा खान,शेख समद भाई,उबाठाचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आशिष रहाटे,उबाठाचे शहरप्रमुख किशोर गारोळे,उबाठा युवासेनेचे तालुकाप्रमुख विधिज्ञ आकाश घोडे,विधिज्ञ संदीप गवई, माजी सभापती सागर पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ गजानन महाराज तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने व स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव भूषण मिनासे यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचे टप्पे विशद केले.
आपल्या उद्घाटनवर भाषणामध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक युगात टिकण्याकरिता मेहनत केली पाहिजे. त्याकरिता इंग्लिश स्कूल योग्य व्यासपीठ असल्याचे सांगितले तसेच संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आमदार सजीद खान पठाण यांनी देखील आपल्या भाषणामध्ये सत्यजित या संस्थेची प्रगती उत्तरोत्तर वाढत जावी तसेच अशा प्रकारची संस्था मी यापूर्वी कधीही पाहिली नाही.असे गौरवोद्गार काढले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थाध्यक्ष श्याम उमाळकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मातोश्री एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था कशाप्रकारे कार्यरत आहे.संस्थेची भविष्यातील वाटचाल कशी काय राहील, याविषयी आपले मत मांडले; आणि वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे,प्रकाश तायडे,व प्रा.आशिष रहाटे, वानखेडे यांची समायोचीत भाषणे झाली.
या निमित्ताने संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये सलग तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्वागत नृत्य, पोस्टर सादरीकरण, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा रस्सीखेच, फ्रॉग्रेस, खो खो, कबड्डी, गीत गायन अशा विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्राचार्य रवींद्र माळी, प्राचार्य डॉक्टर शिवशंकर म्हस्के, प्राचार्य सचिन पनाड व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर खरात तर आभार प्रदर्शन प्राचार्य रवींद्र माळी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.