सिंदखेड राजा 🙁 एकनाथ म्हस्के)
येथून जवळच असलेल्या चिंचोली बावने येथे मागिल अनेक वर्षांपासून पौष पोर्णिमेच्या निमित्ताने उरूस साजरा करण्यात येतो यावेळी यात्रा उत्सव व कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही भव्य कुस्त्यांचे मैदान गाजवण्यात आले.
सिंदखेडराजा तालुक्यातील चिंचोली बावने येथे चॉंदशावली बाबा उरूसा निमित्त ग्रामस्थांनी भव्य कुस्त्यांचे आयोजन केले होते. दरम्यान भव्य यात्रा उत्सव आयोजित करण्यात आली होती. १६ जानेवारी रोजी मराठवाडा व विदर्भातील अनेक मल्ल्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते नारळ फोडुन आखाड्यात कुस्त्यांची सुरूवात करण्यात आली यावेळी सुमारे वीस रूपयांच्या बक्षीस पासून कुस्त्यांना सुरूवात करण्यात आली होती.जवळपास अंशीं ते नव्वद कुस्त्यांचे सामने पार पडले यावेळी निकाली कुस्ती पै. पवन बावने जालना व अक्षय जाधव सोयंदेव ब्राम्हण ता. सिंदखेडराजा या मल्ल्यांची झाली दोघेही एकापेक्षा एक सरस असल्याने अखेर समान कुस्ती म्हणून ग्रामस्थांनी मध्यस्थी करून कुस्ती सोडवीली व कुस्त्यांचे सामने समाप्त करण्यात आले. यावेळी मा. खा. सुखदेव काळे. डॉ भगवान बावने, सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ व परिसरातील कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचोलीत उरुसा निमीत्त भव्य कुस्त्यांची दंगल संपन्न

0
6
6
8
7
0

Leave a comment