युवकांनी नोकरीच्या मागे जास्त न राहता व्यवसायाकडे वळावे :-केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

Khozmaster
2 Min Read

मेहकर 🙁 शहर प्रतिनिधी )
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी 19 जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध व्यवसायाचे उ‌द्घाटन केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब म्हणाले की दिवसेंदिवस सुशिक्षित विकारांची संख्या वाढत आहे मात्र केंद्रशासन व राज्य शासनाकडून सुशिक्षित बेकारांना नोकरी मिळाव्यात यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे वेगवेगळ्या विभागातल्या रिक्त जागा भरण्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्न करीत आहे मात्र अनेक सुशिक्षित बेकारांची संख्या वाढतच असल्याने युवकांनी नोकरीच्या मागे जास्त न राहता व्यवसायाकडे वळावे आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांच्या माध्यमातून विविध व्यवसाय उभारावे व्यवसाय उभारत असताना जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्या व्यवसायाचे अगोदर परिपूर्ण माहिती घेऊन किंवा अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊनच आपले व्यवसाय सुरू करावे म्हणजे व्यवसाय सुरू झाल्यानंतर आपल्याला फायदा झाला पाहिजे जर कोणत्या व्यवसायाची माहिती नसेल तर असे व्यवसाय सुरू करू नयेत वेळ प्रसंगी आपल्याला तोटा सुद्धा होऊ शकतो सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्या आहेत त्यामुळे युवकांनी जिद्द चिकाटी व मेहनत याच्या भरोशावर नोकरी शोधत असताना जोड धंदा म्हणून विविध व्यवसाय सुद्धा करावेत असेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले यावेळी मुंगसरी फाटा चिखली येथे श्री. रमेश सारजुबा काठोळे यांच्या काठोळे पेट्रोलियमचे उदघाटन केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच चिखली येथे डॉ. आकाश मुकुंदराव चांडगे यांच्या चैतन्य दातांचा दवाखान्याचे उदघाटन संपन्न झाले. मलकापूर येथे वैद्य अमित चौधरी यांच्या वेदांश आयुर्वेद हॉस्पीटलचे उदघाटन परम पूज्य १००८ आचार्य स्वामी हरिचैन्यतानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते व केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले.
यावेळी आमदार श्री. चैनसुखजी सेंचती व प्रमुख मान्यवर शहरातील नामवंत वैद्य अधिकारी वर्ग, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 6 4 3 8 2
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *