बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )
शांतता आणि सुव्यवस्थेसाठी धोका ठरणारा डोंगरखंडाळा परिसरातील गावठी हातभट्टी दारूसम्राट गजानन दशरथ जाधव वय 48 वर्ष यास एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी येरवडा जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. या कायद्यान्वये गजानन जाधव एका वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध राहील.कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या कार्यात बाधा निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक शांततेसाठी धोकादायक ठरणाऱ्या गावगुंडांच्या विरोधात एमपीडीए कायदा ब्रम्हास्त्र सिद्ध झाले आहे. एमपीडीए अर्थात महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्यान्वये कार्यवाहीची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी भरमसाठ पुरावे आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी सदरची प्रक्रिया पूर्ण तर केलीच परंतु मोठी हिम्मत दाखवत एम पी डी ए ऍक्टचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने गजानन जाधवला एका वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
गजानन दशरथ जाधव रा. डोंगर खंडाळा ता.जि. बुलढाणा यास सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातुन कोणत्याही प्रकारचे नुकसानदायक कृत्यापासुन परावृत्त करण्याकरीता महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभटटीवाले, औषधीविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट्स) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981) सुधारणा 1996, 2009 आणि 2015) कलम 3(1) अन्वय मध्यवर्ती कारागृह येरवडा, पुणे येथे एक वर्ष स्थानबध्द करण्यात आले आहे.नमुद इसम हा काही कामंधदा करीत नाही. तो गेले 10 ते 12 वर्षा पासुन डोंगरखंडाळा गावातील परीसरात गावठी हातभट्टी दारु तयार करुन अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करीत असे, त्यांचेवर पोलीसांनी छापे टाकुन वेळोवेळी कारवाई केलेली आहे परंतु त्याचे वर्तनात सुधारणा झाली नाही. त्याच्या अवैध दारू व्यवसायामुळे डोंगरखंडाळा गावात काम करणारे ग्रामीण भागातील कामगार, तरुण मुले, दारुच्या आहारी जावुन व्यसनाधीन झालेले आहेत. नमुद इसम सराईत हातभटटीवाला असुन सदर इसम हा बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीतील डोंगरखंडाळा गावत व आजुबाजुच्या परीसरामध्ये मागील सुमारे 10 ते 12 वर्षापासुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारु विक्री करण्यासाठी दारुचे अनेक गुत्ते / अड्डे चालवित होता तर काही गुत्ते तो स्वतः चालवितो. दारु विक्री व वाहतुक यासारखे गुन्हे करण्यात तो गुंतलेला आहे. व गावटी दारु व्यवसायाचा मालक आहे. तसेच तो त्याचे साथीदारांसह वाहनाव्दारे हातभटटी दारुची वाहतुक करताना भरधाव वेगाने वाहन चालवितो. त्यामुळे रस्त्याने येणारे व जाणारे लोक व परीसरातील इतर लोक यांचे जिवीतास धोका निर्माण झाला होता. त्याच्या अवैध दारू व्यवसायामुळे परीसरात दुर्गधी पसरुन परीसरात अस्वच्छता व रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे. वरील सर्व प्रकारच्या बाबी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी जिल्हादंडाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनीही कायदा आणि सुव्यवस्थेला सर्वतोपरी महत्व देत गजानन जाधव विरोधात एम पी डी एक विरोधात कारवाई केली. पीआय गजानन कांबळे यांना मदतनिस म्हणून पोहेकॉ. महादेव इंगळे व संतोष लाहुडकर यांचेही माहिती गोळा करण्याचे परिश्रम महत्वाचे ठरले. विशेष म्हणजे सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, डीवायएसपी सुधीर पाटील आणि एलसीबी प्रमुख श्री लांडे यांच्या मार्गदर्शनात झाली.
डोंगरखंडाळ्याच्या जाधवला येरवडा जेलची वारी
0
6
4
3
8
2
Users Today : 8
Leave a comment