मलकापूर:-( तालुका प्रतिनिधी )
येथील बोदवड रोडवरील पुलाजवळ अनाधिकृत डम्पिंग स्टेशन तयार झाल्याचे संतापजनक चित्र निर्माण झाले आहे. येथे औषधी, घनकचरा, अन्नपदार्थ तसेच घाण वस्तूंचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित यंत्रणा दुर्लश करत असून, हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या ठिकाणी नागरिक घनकचरा आणून टाकत असल्याने अनधिकृत डंपिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिक येथे कचरा, घाण टाकत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला घाण साचली आहे.
या ठिकाणी कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ, तथा मेडिकल संबंधित औषधे, सलाईन, पाण्याच्या बॉटल, सुध्दा उघड्यावर पडलेल्या दिसून येत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ, जनावरे यांच्या आरोग्य धोक्यात आले असून संबंधित प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे.मलकापूर येथील बोदवड रोडनजीकच्या पुलाजवळ दोन्ही बाजूला लांबपर्यंत घनकचऱ्याचे ढिगारे आढळून आले आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, तेथून जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी टाकण्यात आलेल्या कचऱ्यात कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ व औषधी उघड्यावर पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराची ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई तसेच आवश्यक उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
अनधिकृत डंपिंग कोणामुळे ?
अनधिकृत डंपिंग निर्माण झाले व होत आहे. परंतु, या प्रकरणी संबंधित प्रशासनाने कानावर हात ठेवले आहे. या रस्त्यावर सकाळी कचरा कोण टाकतात याचा शोध लागत नाही. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही घनकचरा टाकणाऱ्यांची माहिती नाही. यासोबतच प्रशासन दखल घेईना आणि अनधिकृत डंपिंग करणाऱ्यांचा शोध लागेना अशी स्थिती निर्माण झाली आहे.
घनकचरा, खाद्यपदार्थ, औषधीचे साचले ढीग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
0
6
4
3
8
2
Users Today : 8
Leave a comment