काल मोताळा मतदारसंघातील मौजे निपाना येथे अटल भूजल माहिती केंद्र चे उदघाटन केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते व लोकप्रिय आमदार श्री.संजयजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
मौजे शेलगांव बाजार ता.मोताळा येथे विविध विकास कांमाचे भूमिपूजन उदघाटन संपन्न झाले. व तसेच मौजे शेलगांव बाजार येथील ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
व तसेच मोताळा मतदारसंघातील मौजे आवा,लिहा, पिंपळगाव देवी, सिंदखेड लपाली, धामणगाव बढे,वडगाव खंडोपंत,दाभाडी इत्यादी गावांना भेटी दिल्या व ग्रामस्थाशी संवाद साधला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.ओमसिंग राजपुत, उपजिल्हा प्रमुख मा.भोजराज पाटील, ता.प्रमुख मा.रामदास चौथनकर यांच्या सह शिवसेना, युवासेना महिला आघाडी च्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
Users Today : 18