मेहकर 🙁 शहर प्रतिनिधी )
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकार विभाग तथा महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या वतीने नागपूर ते शिर्डी अशा भव्य सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सहकार दिंडीचे आगमन मेहकर शहरात दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी होणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक मेहकर सहाय्यक निबंधक साबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यजित अर्बनचे अध्यक्ष श्याम उमाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे संचालक माधवराव जाधव, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे संचालक सुदर्शनजी भालेराव, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संतोषराव मापारी, मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बचाटे साहेब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष देशमुख साहेब, यांच्यासह मेहकर लोणार जानेफळ डोणगाव व मेहकर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे अध्यक्ष,संचालक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्याम उमाळकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सदर दिंडीचे नागपूर वरून रिसोड मार्गे दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी मेहकर येथील वेदिका लॉन चौफुली येथे आगमन झाल्यानंतर सदर दिंडी कॉटन मार्केट रोड मार्गे श्री संत गजानन महाराज मंदिर डोणगाव रोड येथे पोहोचणार असून तेथे सदर दिंडीचा मेहकर येथील स्वागत समारोह कार्यक्रम पार पडणार आहे. सदर दिंडी चे आयोजन महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था विषयी सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून करण्यात आलेले असून यावेळी सदर सहकार दिंडीच्या स्वागतासाठी मेहकर शहरातील विविध सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवावा व तसेच शहरातील विविध पतसंस्थांनी आपापल्या पतसंस्थेसमोर फुलांच्या रांगोळ्या काढून,ढोल ताशाच्या गजरात, स्वागत कमान उभारून, फ्लेक्स बोर्ड लावून सदर दिंडीचे स्वागत करावे असे आव्हान केले. स्वागत समारंभ नंतर सदर दिंडीचे प्रस्थान चिखलीकडे होणार असून सदर सहकार दिंडीच्या स्वागत समारोह करता परिसरातील सर्व सहकारी संस्था कार्यालय यांचे अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सत्यजीत अर्बन चे अध्यक्ष श्याम उमाळकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. सदर बैठकीच्या आभार प्रदर्शन फाटे साहेब यांनी केले.