घराचे बांधकाम करताना प्राचीन भुयार आढळले!

Khozmaster
2 Min Read
बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )

तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे एका घराच्या बांधकामादरम्यान भुयार आढळून आले. हे भुयार ऐतिहासिक असून, अद्यापही सुव्यवस्थित असल्याचे दिसून आले. हे मोठे भुयार पाहण्यासाठी गावात ग्रामस्थांची गर्दी जमली. नंतर परिसरातील हजारो ग्रामस्थ मिळेल त्या वाहनाने साखळीमध्ये दाखल झाले. यानंतर बुलडाणा व चिखली तालुक्यातील नागरिकांचीही गर्दी उसळली. साखळी बुद्रुक येथील रवींद्र आप्पा साखळीकर यांनी घराच्या बांधकामासाठी नुकतीच पाया खोदण्यास सुरुवात केली. हे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणाऱ्या मजुरांना एक मोठा माठ सापडला. माठ बाजूला केल्यानंतर खाली मोठे भुयार दिसून आले, खोदता-खोदता ते भुयार एवढ मोठे होत गेले की बांधकाम करणारे मजूर, गवंडी, घरमालक साखळीकर आणि ग्रामस्थ चकीत झाले. हा भुयारी रस्ता कुठे जात आहे याचा शोध लागला नसून ते  सर्वसामान्यांसाठी अशक्यच आहे. यामुळे पुरातत्त्व विभागाने प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करावी व खोदकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

भुयाराचा काळ कोणता ?
बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा नगरीत शिवकालीन पराक्रमी जाधव घराण्याच्या इमारती, जिजाऊचे जन्मस्थान असलेला राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा, त्यांचे समाधी स्थळ, रामेश्वर मंदिर, चांदणी तलाव, बारव हे जाधव घराण्याच्या वैभवाचे साक्षीदार आहे त्याशिवाय बुलडाण्यानजीकच्या देऊळघाट येथे मुगलकालीन गढी, तटबंदीचे अवशेष आहेत. साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथे, रोहिणखेड (ता. मोताळा) येथे निजामशाही, आदिलशाही कालीन अवशेष, पूरातन विशिष्ट बांधकामाच्या मशीद, मलकापूर येथे मुगलकालीन प्रवेशद्वार असे अनेक अवशेष आहेत. यामुळे साखळी बुद्रुक येथे आढळून आलेले भुयार कोणत्या काळातील आहे. याबद्धल इतिहास, संस्कृतीप्रेमीमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
0 6 6 8 3 2
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

05:25