देऊळगांव राजा : -( दत्ता हांडे)
आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी मांडले.
स्थानिक नगर पालिका कार्यालय समोरिल प्रांगनात दि.९ फेब्रुवारी रविवारी रोजी दुपारी १ वाजता ‘न समजलेले आईबाप… समजून घेताना’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. राजेन्द्र शिंगणे हे उद्घाउ म्हणून होते तर विशेष प्रमुख उपस्थितीत मा.आम डॉ .शशिकांत खेडेकर व बाजार समितीचे माजी संचालक एल.एम शिंगणे होते शहरातील व परिसरातील जवळपास सर्वच शाळांमधून विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रांतीक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्ष सुषमा राऊत यांनी कार्यक्रमाचे उद्देश्य सांगितले. तर मा।मंत्री डॉ शिंगणे यांनी बोलताना आईबाप याची महती सांगितले जर आईबाप प्रत्येक पाल्यांनी समजले तर वद्धाश्रमाची गरजच राहणार नाही .तर बोलताना डॉ. हंकारे म्हणाले की, मुला – मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका, त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना केले. तुम्ही आयपीएलचे रन मोजतात, त्यांचा हिशेब ठेवतात, ज्या आई-बापाने आपल्याला जन्म दिला, मोठे केले, अंगा-खांद्यावर खेळवले, त्या बापाने आपल्यासाठी किती रन काढले आहे. याचा हिशेब तुम्ही कधी करणार? कारण आज हिशेब करण्याची वेळ आलेली आहे. तो तुम्हाला करावाच लागेल, असे विद्यार्थ्यांना त्यांनी बजावून सांगितले. भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले मात्र ते पाहण्यासाठी जर आई-बाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग होणार काय? असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला.
आई-बाबांनी लहानपणी आपल्यासाठी काय केले आहे, हे तुम्हाला चांगले माहिती आहे, लहानपणी आपल्याला आई-बाप कळत होते, आता मात्र आम्ही कॉलेजला जायला लागलो, आम्हाला बंधनात तुम्ही ठेवायला लागले, असा तुमचा समज झाला आहे, त्यामुळे मम्मी-पप्पा तुम्ही आम्हाला आता आवडत नाही, आय हेट यू, मम्मी-पप्पा अशी वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागली आहे. पण असे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे. परत एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आई-बाप यातून नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद डॉ. हंकारे यांनी व्यक्त केला. जो निराधार, त्याला आई-बापाची किंमत विचारा… आई-बापाची किंमत त्याला विचारा ज्याचे लहानपणीच आई-बाप त्याला सोडून गेले आहेत. ते तुम्हाला पूर्ण जाणीव करून देतील असे सांगत सणासुदीला आपला बाप कपड्याच्या दुकानात ज्यावेळी नवीन कपडे खरेदी करून देण्यासाठी आपल्याला घेऊन जातो, त्यावेळी संपूर्ण दुकान आपले असल्याचा भास होतो. कारण पाठीमागे आपला बाप असतो. तसेच डॉ शशिकांत खेडेकर यांनी मनोगतात आई बाप व पाल्यांनी संस्कार व संस्कृती जपली तर आईवडिलांनी केलेल्या कष्टाची फलीत झाले. असे सांगितले . कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अर्जुनकुमार आंधळे यानी केले तर कार्यकर्माच्या यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष सौ.सुनीता शिंदे, मालतीताई कायंदे, न.प माजी गटनेत्या सौ.सुनीता सवडे, जिजाऊ ब्रीगेटच्या सौ.संगीता मोगल,शिवसेना संघटक सौ.भाग्यश्री खेडेकर, मा.नगरसेवक दीपमाला गोमधरे, महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा जिल्हा अध्यक्ष सुषमा राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.
आ.डॉ .शशिकांत खेडेकर मनोगता कार्यक्रम आयोजकांचे अभीनंदन केले .
आईबाप आपण यांचे उपकार कधीच फेडू शकत नाही प्रत्येक ने देवादिकांच्या पेक्षाही आईबापाची ची महती आहे म्हणून ण पहीला गुरू ही आपली आई असते ..