मेहकर, लोणार तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा,त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आ. सिद्धार्थ खरात यांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

Khozmaster
3 Min Read
मेहकर 🙁 शहर प्रतिनिधी )
मेहकर व लोणार या दोन तालुक्यात अनुक्रमे ९२ व ६५ अशा सुमारे दिडशे गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कामे सुरु आहेत. या जलजीवन योजनेच्या कामात प्रचंड अनियमितता दिसून येत आहेत. यासंदर्भात माझ्याकडे तोंडी तसेच लेखी स्वरुपात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जलजीवनची कामे न झाल्याने अथवा झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश व संताप व्यक्त होत आहे. तरी दोन्ही तालुक्यात चालू व अर्धवट अवस्थेत असलेल्या जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात यावी व याबाबतचा चौकशी अहवाल मला अवगत करण्यात यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
       आमदार सिद्धार्थ खरात यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, बुलडाणा जिल्हयामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मेहकर व लोणार तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा उडला आहे, हे निर्वीवाद आहे. उदा. कुठे मूळ पाण्याचा स्त्रोत नसताना अथवा सदरहू स्त्रोत शाश्वत नसताना पाईपलाईनची कामे करणे, पूर्ण काम न होता त्याची झालेल्या अर्धवट कामाची बिले उचलून कामे अर्धवट सोडणे, पाण्याची टाकी नसणे, विद्युत जोडणी नसणे, गाव अंतर्गत सुस्थितीतील रस्ते खोदून तेथे पाईपलाईनची कामे केल्यामुळे रस्ते अस्ताव्यस्त होणे, रस्ता उखडणे, पाईपलाईनचे काम सुमारे दोन वर्षापासून केले असल्याने सदर पाईपांचे नुकसान होणे, लावलेल्या नळांच्या तोटयांची चोरी होणे ही व अशा प्रकारच्या अनेक अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. काही अपवाद वगळता जलजीवनच्या सर्व कामांत शासनाच्या (जनतेच्या) निधीचा अपव्यय झाले असल्याचे दिसून येत आहे. तरी त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे.
 वडाळी गावात आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली प्रत्यक्ष पाहणी : 
 
मेहकर मतदार संघातील वडाळी हे शेवटच्या टोकावरील गाव आहे. या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काम दोन-तीन वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी गैरसोय होत आहे. अर्धा किलोमीटर रस्ता चढून महिलांना एक- दोन हांडे घेऊन जावे लागत आहे. फेब्रुवारी महिना पाहता पाणी दुर्भिक्ष ही मोठी समस्या असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी निर्देश दिले.
      यावेळी उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, सर्कल प्रमुख साहेबराव हिवाळे, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, वरवंट चे उपसरपंच गजानन राठोड, उपस्थित होते.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *