मेहकर 🙁शहर प्रतिनिधी )
नेहमीच होळीला सोंग घेऊन परंपरा पाळणारे मेहकर आगाराचे सेवानिवृत्त रोखपाल प्रकाश मादनकर यांची ढासळती प्रकृती साथ देत नसली तरी त्यांनी यंदा अल्लू अर्जुन अर्थात पुष्पा साकारुन नाविन्यपूर्ण सोंग घेत आज रंग खेळण्यासाठी ‘झुकेंगा नहीं साला’ म्हटलेच नाहीतर त्यांनी सोंगाचे संवर्धन केले आहे.
आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले तरी स्मार्ट सिटीतील गावांमध्ये सण, उत्सवाची परंपरा पूर्वीप्रमाणेच जोपासली जात आहे. लोणार म्हणजे उल्कानगरीत हा सण अति उत्साहाने साजरा केला जातो. 1246 पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही कायम आहे. होळी उत्सवाला मोठे महत्त्व दिले जाते. होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम ठेवून आहे. अशात दरवर्षी प्रमाणे आकर्षण असलेल्या होळी उत्सवाला प्रकाश मादनकर यांनी नावीन्यपूर्ण सोंग घेतले. प्रकाश मादनकर हे मेहकर आगाराचे सेवानिवृत्त रोखपाल आहेत. अगदी तरूण पणापासून नोकरीवर असतांना सुद्धा कोणताही गर्व न करता आपल्या कोळी समाजाची पुरातन सोंग परंपरा ते आतापर्यंत कायम ठेवत आले आहेत. दरवर्षी आपल्या अनोख्या शैलीत प्रसिद्ध झालेले पात्र साकारून ते समाजात काही संदेश देत असतात व लोणार भ्रमण करत असतात. या वर्षी उत्सुकता होती.. या वर्षी वाढते वय व प्रकृतीमुळे ते सोंग घेतील की नाही याची खात्री नव्हती. पण वय व प्रकृतीपुढे ‘झुकेगा नही साला..’ म्हणत त्यांनी यावर्षी खूप छान पुष्पा साकारलाच! अशा ह्या अनोख्या दिलदार धडाडीच्या कलाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Users Today : 20