महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोला जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले

Khozmaster
2 Min Read

अकोला :- ( विशेष प्रतिनिधी )

बिहार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करावे व हे बौद्ध विहार ब्राह्मणांच्या हातातून घेऊन बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे.या विहारात ज्या ट्रस्टवर 5 ब्राह्मण व 4 बौद्ध भिक्षू आहेत या ट्रस्टवर परिपूर्ण बौद्ध भिक्खू असले पाहिजे त्यांच्या व्यतिरिक्त त्या बौद्ध विहारात कुठलाही ब्राह्मण हिंदू समाजाचे कोणत्याही व्यक्तीला घेता कामा नाही.जसे कोणत्याही हिंदूंच्या मंदिरात.बौद्ध भिक्खू नसतो.कुठल्याही चर्चमध्ये ख्रिश्चन समाजाच्या व्यतिरिक्त नसतो.मज्जिद मध्ये मुसलमान समाजाच्या व्यतिरिक्त नसतो. गुरुद्वार मध्ये सिख धर्माच्या व्यतिरिक्त नसतो,मग बौद्ध विहारात ब्राह्मण कसे.? महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू च्या ताब्यात का नाही.?.श्री काशी विश्वनाथ मंदिर कायदा १९८३ ॲक्ट आहे ज्या कायद्यात तरतूद आहे जी व्यक्ती हिंदू नसणार त्यांना मंदिराच्या कोणत्याही समितीत सदस्य होता येणार नाही.येथे कर्मचारी देखील हिंदूच पाहिजे (कलम ३,कलम ६ ( २ ) मध्ये तरतूद आहे,मग महाबोधी महाविहार समितीत फक्त बौद्धच का नाहीत.?.इथं हिंदू ब्राह्मण कसे.?.

 

हे सर्व बदललं पाहिजे बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार परिपूर्ण बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात दिलं पाहिजे,बुद्धगया इथे सुरू असलेल्या आंदोलनात बौद्ध भिक्खू च्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी आम्ही मागणी करतो भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले या आंदोलना आम्ही उपस्थित होतो.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट .मुक्त करा मुक्त करा..महाबोधी महाविहार मुक्त करा.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *