डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात अध्यक्षपदी डॉ. अनिलकुमार गाभणे

Khozmaster
2 Min Read

मेहकर 🙁 शहर प्रतिनिधी )

सर्व वैद्यकीय शाखांच्या डॉक्टरांना समाविष्ट करून येथे मेहकर तालुका डॉक्टर असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष डॉ. भगवान झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. अनिलकुमार गाभणे यांनी तालुकाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. डॉ. भगवान झंवर इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात पार पडलेल्या पदग्रहण समारंभाला उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, पोलीस निरीक्षक व्यंकटेश मालेवार उपस्थित होते. ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि दंतचिकित्सक अशा वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांच्या स्वतंत्र संघटना आहेत. परंतु सर्व शाखांच्या डॉक्टरांना समाविष्ट करून तालुका पातळीवर एक संघटना असावी या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष डॉ. भगवान झंवर यांनी नवीन संघटनेची नोंदणी केली. राज्यात अशा प्रकारे प्रथमच सर्व वैद्यकीय शाखांची एक संघटना स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये मेहकर तालुकाध्यक्षपदी डॉ. अनिलकुमार गाभणे, उपाध्यक्ष डॉ. अनिल राठोड, डॉ. सुभाष लोहिया, डॉ. प्रशांत खडसे, सचिव डॉ. अमोल कानोडजे, सहसचिव डॉ. सत्यजित चांगाडे, डॉ. प्रीतीलता आव्हाळे, कोषाध्यक्ष डॉ. सुनील भराडे, डॉ. सुजित महाजन तर कार्यकारणी सदस्य डॉ. गोविंद झंवर, डॉ. निलेश सानप डॉ. गजानन उल्हेमाले, डॉ. धीरज राठी, डॉ. रेणुका निंभोरकर, डॉ. किरण नागोलकर, डॉ. प्रशांत वायाळ, डॉ. आशिष लोहिया, डॉ. महेश रोकडे यांनी पद्भार स्वीकारला. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या ३५ वर्षांपासून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. जयाताई आव्हाळे, डॉ. वृशाली सावजी, डॉ. धाडकर यांचाही यावेळी मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शिवाजी चांगाडे, डॉ. केशव अवचार, डॉ. हनुमान लाहोटी, डॉ. अनिल राठोड यांच्यासह १४९ डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मगरकर यांचे  व्याखयान पार पाडले .

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *